________________
क्रोध
१३
करू कि तू का मारलेस? आणि पहाडावरून गडगडत दगड येऊन लागला आणि डोक्यातून रक्त निघाले, तेव्हा पहाल पण क्रोध नाही करणार !
हे तर आपल्या मनाला असे वाटते कि तोच करत आहे. कोणी मनुष्य जाणून- बुजुन मारूच शकत नाही. अर्थात् पहाडावरून दगड पडणे आणि हा मनुष्यांनी दगड मारणे, हे दोन्ही समानच आहेत. पण भ्रांतिने असे दिसते कि हा करतो. ह्या जगात कुठल्याही मनुष्याला संडासला जाण्याची शक्ति नाही.
आपल्याला कळले कि कोणी जाणून-बुजून नाही मारले, तेव्हा तिथे क्रोध नाही करत. मग सांगतो, 'मला क्रोध येतो. माझा स्वभाव क्रोधी आहे.' अरे, स्वभावाने क्रोध नाही येत. तो पोलिसांच्यासमोर का नाही येत? पोलिसांनी धमकावले, त्या वेळी पोलिसांवर क्रोध का नाही येत? त्याला पत्नीचा राग येतो, मुलांवर क्रोध येतो, शेजाऱ्यांवर, अन्डरहेंड (सहाय्यक) वर क्रोध येतो आणि 'बॉस' वर का नाही येत? क्रोध असाच, स्वभावाने मनुष्याला नाही येत. ही तर त्याला स्वत:ची मनमानी करायची आहे.
प्रश्नकर्ता : कशाप्रकारे त्याला कंट्रोल करायचे?
दादाश्री : समजूतीने. हे जे आपल्या समोर येते, हे तर निमित्त आहे आणि आपल्याच कर्माचे फल देत आहे. हे निमित्त बनले आहे. आता असे समजले, तर क्रोध कंट्रोलमध्ये येईल. जेव्हा दगड पहाडावरून पडला, असे बघता, तेव्हा आपण कंट्रोल करू शकता. तर ह्यात ही समज ठेवण्याची जरूरत आहे कि भाऊ, हे सगळे पहाडा समानच आहे.
रस्त्यात कोणी गाडीवाला चुकीच्या मार्गाने आपल्या समोर आला आहे तरी पण तिथे भांडत नाही ना? क्रोध नाही करत ना? आपण त्याला टक्कर देऊन तोडून द्यायचे, असे करतो का? नाही. तर तिथे का नाही करत? तिथे शहाणे होऊन जाता कि मी मरून जाईन. अरे भाऊ ! त्याहून