________________
क्रोध प्रश्नकर्ता : कदाचित नाही मानणार.
दादाश्री : नाही मानन्याचे काय कारण आहे? आपली पर्सनालिटी (प्रभाव) नाही पडत. अर्थात्, कमजोरी नाही असली पाहिजे, चारित्र्यवान असले पाहिजे. 'मेन ऑफ पर्सनालिटी' असले पाहिजे. लाखो गुंडे त्याला पाहताच पळून जाणार! चिडचिड्या माणसांपासून कोणी पळून नाही जाणार उलट मारतील पण! संसार तर कमजोरालाच मारणार ना.
अर्थात् मेन ऑफ पर्सनालिटी असले पाहिजे. पर्सनालिटी कधी येते ? विज्ञान जाणल्यावर पर्सनालिटी येते. ह्या संसारात जे विसरून जातात, ते (रिलेटिव) व्यवहारज्ञान आहे, आणि ज्याला कधीही विसरता येत नाही ते विज्ञान आहे.
गरमीपेक्षा हिम भारी आपल्याला माहीत आहे, हिमवर्षा होते? हिम म्हणजे अति थंड. ह्या हिमाने झाडे जळतात, कापूस-गवत सगळे जळून जाते. ते थंडीत का जळून जातात?
प्रश्नकर्ता : ओवरलिमिट' (अति)थंडीमुळे.
दादाश्री : हां, अर्थात् जर आपण थंड होऊन राहिलात तर असे 'शील' उत्पन्न होईल.
क्रोध बंद तिथे प्रताप प्रश्नकर्ता : पण दादाजी, जरूरती पेक्षा जास्त थंड होणे, ही पण एक कमजोरी आहे ना?
दादाश्री : जरूरतीपेक्षा जास्त थंड व्हायची गरजच नाही. आपल्याला लिमिटमध्ये राहायचे आहे, त्याला 'नॉर्मालिटी' म्हणतात. बीलो नॉर्मल इज द फिवर, एबाव नॉर्मल इज द फीवर, नाईन्टी एट (९८) इझ द नॉर्मल. अर्थात् आपल्याला नॉर्मालिीटीच हवी.