________________
महावीरचरित्र
निराळी द्रव्य मिसळल्याने ज्याप्रमाणे दारू तयार होते त्याचप्रमाणे पंचमहाभूतातून जीवाची उत्पप्ति होते असे तो मानीत असे. तो परलोक अजिबात मानीत नसे. थोडक्यात सांगावयाचे म्हटले म्हणजे तो चावीकमताचा सूचकच होता. __ मस्करीगोशाल हा आजीविकपंथाचा पुरस्कर्ता होता. आज हा संप्रदाय हिंदुस्तानांतून नष्ट झाला असला तरी त्याचा उल्लेख अशोकराजाच्या शिलालेखांत सांपडतो. हा अहिंसावादाचा पुरस्कर्ता होता व स्वतः नमहि राहत असे. मुद्दाम तयार केलेला उद्दिष्टादि आहार तो स्वीकारीत नसे. तो आचारावर फार जोर देत असे. जनतत्वज्ञान व आचार याबराबर आजीविक मताची फारच साम्यता दिसन येते. व या साम्यतेवरून याकोबी वैगरे विद्वान पंडितांनी अशी कल्पना केली आहे की, महावीरतीर्थकरांनी गोशाळ याच्या मनांतून नन्नता, अहिंसा, आहारोवहाराच नियम वगरे तत्वे घेतली असावीत. संकृतदर्शनी हे किचित् बरोबर दिसते परंतु थोड्या बुद्धीने पाहिल्यावर गोशाल व महावीर यांचा काय संबंध होता हे समजेल. गोशाल हा महावीराहनही वयोवृद्ध होता. व दोघे सहा वर्षे मिळूनहि राहात होते. पण पुढे त्यांचे न पटल्याकारणाने गोशाल हा महावीरतीर्थकरांना सोडून गेला. गोशाल याची मते जैनधर्माशी जुळतात याच कारण असे आहे की, गोशाल हा प्रथमत: पार्श्वनाथर्थिकगच्या परंपरेतील हाता. याला पुरावा भावसंग्रह नामक प्राकृत दिगंबरजनग्रंथांत सांपडतो. त्यांत मस्करी हा पार्श्वनाथतीर्थात उत्पन्न झाला होता असे सांगितले आहे. म्हणूनच त्याची मते जैनधीशी इतकी जुळतात. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लायमनसाद्देवाचं मताप्रमाणे महावीरतीर्थकरांनी गोशालाचे अनुकरण करूनच लेझ्यातत्वाचा उपदेश केला. हे मत तरी खास फोल आहे. यांत तिळमात्र शंका नाही. आजीविकमताप्रमाण मनुष्यवर्गाचे सहा भाग केलेले आहेत. या सहा भागांचा व जैनाच्या सहा लेण्यांचा वरील साहेबाच्या समजुतीप्रमाणे कसा संबंध पोहोचतो हे काही कळत नाही. या दोन्हीत काही तरी साम्य असले तर ते सहा हा आंकडाच होय. लेझ्यातत्व हे एक स्वतंत्र जनांचे तत्व असून त्याचा जनकर्मतत्वाबरोबर अत्यंत निकट असा संबंध आहे व जनकर्मतत्व हैं जैनांचंच वैशिष्टय आहे हे वर सांगितलेच अहे. गोशालाने बरीच तत्वे पार्श्वनाथर्थिकरांच्या संप्रदायांतून घेतली होती व पार्श्वनाथ व महावीर हे एकच संप्रदायाचे क्रमागत तीर्थकर असल्यामुळे गोशाल याची काही मते जैनधर्मा
(१८)