________________
महावीरचरित्र
महावीर व बुद्ध यांचा काल वरील कारणामुळे भारतीय तत्वज्ञानप्रवाहांत महत्त्वाचा समजला जातो व त्यावेळी प्रचलित असलेल्या सर्व नाहीतरी महत्त्वाचे मतांविषयी माहिती गोळा करणे हे एक महत्त्वाचे काम होऊन बसले आहे. जैनधर्मासंबंधी प्राच्यसंशोधकांचे मत दिवसेंदिवस बदलत गेल्यामुळे त्यावेळी प्रचलित असलेल्या धर्माशी जैनधर्माचा काय संबंध होता याविषयींहि निरनिराळी मतें प्रचलित झालेली आहेत. जेनतत्वज्ञानाची प्रत्यक्ष अशी ओळख फार थोग्या संशोधकांना असल्याकारणाने गरसमज पसरविणारी बरीच ठोकळ मते प्रतिपादिली गेली आहेत. गेल्या शतमानांत प्रतिपादिली गेलीली मतें आज ग्राह्य ठरत नाहीत कारण त्यानंतर संशोधनाचे काम बरेंच पुढे गेलेले आहे. डॉ. हर्मान याकोबी यांनी १८८४ च्या सुमारास जनसुत्राचे भाषांतर केले त्यावेळी लिहिलेल्या त्यांच्या प्रस्तावनेत त्यांनी म्हटले होते की, महावीर व वुद्ध या दोणेवर तत्कालीन मतांचा फार परिणाम झाला आहे. परंतु हे मत त्यांनी पुढे कसे सोडन दिले तें त्यांच्या एका अलीकडच्या लिखाणांल उताऱ्यावरून दाखविले आहे. त्यांत ते स्पष्ट म्हणतात " जैनधर्म हा एक स्वतंत्र प्रार्चन धर्म आहे. आणि तसे असणे हे भारतीय संस्कृतीत कसे शक्य आहे हे वर दाखविले आहे. आम्ही आर्यतरसंस्कृतीची रूपरेषा वर दिली आहे. व त्याच दृष्टीने बुद्ध समकालीन सर्व तार्थकाकडे नजर टाकल्यास जैनधर्माच्या स्वतंत्रतेची कल्पना येण्यासारखी आहे. समसामइक तीर्थकांच्याविषयीं जी माहिती सांपडते ती बहुधा बौद्ध व जैनसूत्रांत सांपडते व ती फारच त्रोटक आहे. आतापर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीत ही एकसूत्रता दिसन येत नाही. या सर्व तीर्थकांचे जैन किंवा बौद्धसूत्राप्रमाणे स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध नसल्याकारणाने या त्रोटक माहिवरून आम्ही मागे सांगितलेल्या आयतरसंस्कृतविर विशेष प्रकाश पडण्यासारखे काहीच अनुमानितां येत नाही. तरीपण मिळालेली त्रोटक माहिती अल्पांशी का होईना जैन व बौद्धकल्पनेशी जुळत असल्याकारणाने व त्या सर्व तीर्थकांना वैदिकसंस्कृतिप्रवाहांत जागा न मिळाल्याकारणाने ते सर्व तीर्थक आर्यतरंसस्कृतिप्रवाहांकडे होते असे गृहीत धरण्यास काहीच व्यत्यय दिसून येत नाही. जनसूत्रांत नांवनिशीसहित गोशालाखेरीज कोणत्याहि इतर तीर्थकांची विशेष माहिती सापडत नाही. म्हणून आपणांस बहुतेक माहिती बौद्धग्रंथावरूनच ध्यावी लागते. सूत्रकृतांग