Book Title: Aradhana Kathakosha
Author(s): Bhattarak Chandrakirti, Shantikumar Jaykumar Killedar
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
View full book text
________________
६६ : आराधना कथाकोष
उक्त दुहा । दया धरम जग में बडो, सब धरममाहि परधान । साधो दया न छांडिय, जब लग घट में प्राण || ८७ ॥
याहाचे सप्तभवांतरी । वैर चालिले असे थोर । यास्तव मुनिचे शरीरि । उपसर्ग भारि महत्केला ॥८८॥ तत्संबोधवाक्य ऐकून । नागेंद्र वदे त्या कारण । हे वैर उद्भविले कवने गुण । ते निवेदन करि मज ॥ ८९ ॥ ऐकोनिया फणींद्र उक्ति । दिवाकर वदे त्याप्रति । तुवा आइकावे येकचित्ति । जेन्हे क्रोध शांति पावल ॥ ९० ॥ या जंबूद्वीपामाजि सार । भरतक्षेत्र असे सुंदर । स्वर्गमोक्षाचे माहेर । असे धर्माधार भव्यजना ॥ ९१ ॥ त्या भारतक्षेत्रामाझारि । सिंहपुर नामे असे नगरी । वनोपवने करोनि साजिरि । अमरपुरीसम असे ।।९२।।
तया नगरीचा राजा । सिंहसेन वो जा । प्रतापे जैसे भानु दुजा । पालिति प्रजा नीति मार्गे ॥९३॥ तया भूपतिचि रामा | रामदत्ता असे नामा | लावन्यगुणाचि सीमा । शीलमहिमा असे जनि || १४ || त्या भूपतीचा प्रधान । श्रीभूति नामे असे जान । मिथ्यादृष्टि पापिष्ट दुर्जन | दांभीक वचन फार वदे ||९५|| फाकल वाक्यं वदोनि फार । सत्य गुणाचा विस्तार | जगी करिता झाला थोर । पावला प्रचुर मान्य जगि ।। ९६ ।। यज्ञोपवित्रासि कर्तरी । बांधोनि वदे सभांतरि । हे जिह्वा अलीक" वदे जरि । तदा येकेसरी छेदिन ॥ ९७ ॥
१६. असत्य.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org