Book Title: Aradhana Kathakosha
Author(s): Bhattarak Chandrakirti, Shantikumar Jaykumar Killedar
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
View full book text
________________
२९० : आराधना-कथाकोष म्हणे जी स्वामि नृपवरा । शूलारोदकृत ज्या तस्करा । धनदत्त तेथे जावोनि त्वरा । त्यासवे विचारा करीत होता ॥१२८॥ आजवरि केली जे चोरी । ते ठेविलि असे श्रेष्ठीचे घरी । म्हणोनि धनाढय जाल थोर । मम वैखरी सत्य मानि राया १२९ जगि जे वसति दुष्टजन । तयाचा व्यवहार हाचि जान । जरी रिक्त जाय एक दिन । तरी जीवासि ऊन मानिति ॥१३०॥ तद्वाक्य ऐकोनि नृप । हृदयि प्रजलला महत्कोप । म्हणे हा श्रेष्ठी पापरूप । करिति व्याप पातकाचा ।।१३।। तदा पाचारोनि पंचदूत । निरोप दिधला त्याहात । सीघ्र जावोनि दुष्टात । धनदत्तात धरोनि आना ॥१३२॥ ऐसे वदताचि भूपाल । दूत धाविनले जैसे काळ । खड्गहस्ते दिसति विक्राळ । नृपबळ अंगी शक्ति असे ।।१३३।। तदा त्या तस्कराचा जीव । स्वर्गि झाला असे जो देव । तदासन होता कंपारव । कळला तद्भाव अवधिबले ॥१३४॥ अहो ज्या श्रेष्ठिने मजवर । उपकार केला असे थोर । महोपसर्ग त्याजवर । मन्निमित्त होणार या क्षणि ॥१३५।। कृतोपकार जे न मानिति । ते जानावे दुष्टमति । वृथा जन्मले या क्षिति । देवमानवगतीमाजि ॥१३६॥ ऐसे विचारोनि अंतरि । स्थूलयष्टिका धरोनि करी । द्वारपालाकृति धरोनि सत्वरि । श्रेष्ठचे गृहद्वारि तिष्टला ॥१३७॥ तत्क्षणि ते राजकिंकर । रौद्ररूपे येवोनि सत्वर । देवासि वदति वाक्यरौद्र । मार्ग सोडि पामर नराधम ॥१३८।। देव वदे रे गर्दभसुता । सारिखे का वरडाविता । काय कार्य असे ते आता । वदावे त्वरिता मजपुढे ॥१३९॥
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org