Book Title: Aradhana Kathakosha
Author(s): Bhattarak Chandrakirti, Shantikumar Jaykumar Killedar
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
View full book text
________________
५०६ । आराधना-कथाकोष चौदा रत्न आपत्स्योत्पन्न । शांनौ सहस्रा स्त्रिया सगुण । साठ हजार पुत्र भान । पुण्योदयान सर्व सुखी ।।९९।। पूर्वदत्ते सुजन्म प्राप्त । पूर्वपुण्यसुविधा होत । पूर्व सुकृत भार्या येत । सुपुत्र प्राप्त पूर्वदत्ते ॥१०॥ तदा सिद्धक्षेत्र वनात । चतुर्मुख चैत्यालयात । महामुनि ज्ञानवंत । केवळज्ञान प्राप्त तयासी ॥१०१॥ देवेंद्र खगेंद्र मिळोनी । पूजार्थी विमानी वैसोनी । सहपरिवारे येवोनी । जिनार्चनी जय जय शब्द ॥१०२॥ ते ऐकोनिया सर्व युक्ती । सगरराजा चक्रवर्ती । समवशरणी पूजायुक्ती । धर्मस्थिती उपदेशक ।।१०३।। मणिकेतु खगेंद्रदेव । चक्रवर्ती बैसले भाव । धर्मचर्चा जिनवैभव । सांगती सर्व जिनभाषित ॥१०४॥ जीव अनंत संसारी । सुख दुःख चौयाशी घरी । पुनरपि जन्म वेरझारी । षड्पुि वैरी न सोडिती ॥१०५।। देव म्हणे भूमीदेवराय । बहुत सांगु आता काय । आत्मप्रचीत धरा सोय । पुण्य उदये सुख प्राप्ती ।।१०६।। अच्युतस्वर्गी पुण्य केले । चक्रवर्ती पद पावले । सर्वही सुख पूर्ण भोगिले । राज्यही केले चिरकाळ ॥१०७॥ आता श्रीजिनेंद्रभाषित । तप दीक्षा घ्यावी त्वरित । सावधान करोनी चित्त । करावी प्रीत सिव स्त्रियची ॥१०८॥ इति श्री सगररायासी । विरक्तता न होय तयासी । लोभ सतत संपत्तीसी । महामोहेसी मूच्छित तो ॥१०९।। तयाचे मानस जानोन । सूर गेला तो निजस्थान । विना पुण्यलब्धी वाचोन । दीक्षाकल्याण कैच जीवा ।।११०॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org