Book Title: Aradhana Kathakosha
Author(s): Bhattarak Chandrakirti, Shantikumar Jaykumar Killedar
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
View full book text
________________
प्रसंग चौरेचाळीसावा : ५९५
जैनधर्म सोडोन द्यावा । आपला गुरू बौध बाबा । त्यासीच नमस्कार करावा । मुनी धरावा कुळधर्म ।।१५१।। ते ऐकोन जयसेनान । जैनधर्म निहिंसिक जान । दयाधर्म तो त्रिभुवन । तारू निधान निश्चयेसी ।।१५२।। जरी सूर्य पश्चिमे उदय । तथापि अंती शांती होय । तरी न सोडी धर्मसोय । देह जाय तरी जावो हा ॥१५३।। ज्यानी जानला जैनधर्म । तो टाकिता महा अधर्म । ज्याचा निश्चय दृढवर्म । मेरूसम अचल तो ॥१५४।। सुमति दुष्टा श्रुत जाले । त्यान सुभट पाठविले । त्यास मारोनि वहिले । सीघ्र आले पाहिजे ।।१५५।। ते आले श्रावस्ती ग्रामासी । संधी पाहती मारायासी । इलाज न चाले पुण्यासी । क्षीण मानसी ते जाहले ॥१५६।। ते आले परतोन समस्त । सर्व सांगितला वृत्तान्त । पापात्मा जाला क्रोधवंत । विचारीत दुष्टबुद्धी तो ॥१५७।। सभेत केला त्याहान पण । कोन्ही मारील जयसेन । त्यासी अद्धं राज्य देईन । निश्चय करण सुभट हो । १५८।। त्या समयी त्याचाच सुत । आहिमाख्ये जोडित हात । म्हणे मी करीन या कार्यात । असावे स्वस्थ राजेश्री ।।१५९।। राजे मदपापमंडित । कुकर्मी विचारी मनात । म्हणे तो जैनधर्मी सत्य । रीघ तेथे नव्हे आमचा ।।१६०।। श्रावस्ती नगरासी आला । वृषभमुनी तेथे पाहिला । प्रपंचदीक्षा घेता जाला । सेवाभावाला दावि कपटी ।।१६१।। एकदा जयसेन राजा । सरळचित्ते देवपूजा। चैताळियात गुरूराजा । नमोस्तु वोजा त्रिःपरीत्य ।।१६२।।
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org