Book Title: Aradhana Kathakosha
Author(s): Bhattarak Chandrakirti, Shantikumar Jaykumar Killedar
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
View full book text
________________
७५० : माराधना-कथाकोष
पहिली प्रतिमाते दर्शन । व्रत सम्यक्त्व जे श्रीजिन । एक अरहंत देवाविन । दुजा नयन न पहावे ।।९५।। तेच म्हणावे सम्यक्त्वी । देवदर्शन दृढभक्ती । यथाशक्ती करिती स्तुती । आराधना करिती प्रथमा ।।९६।। सम्यक्त्व आराधना दूसरी । ते मोक्षमार्गाची पायरी। सम्यक्ज्ञान पंचप्रकारी । ज्ञान आंतरी भक्तियोग्य ।।९७।। सम्यक् चारित्र त्रितय । ते आराधिती मुनीराय । तेरा प्रकार त्याची सोय । मोक्षउपाय मार्ग तोची ।।९८।। चौथी भक्ती आराधना । ध्यान अध्ययन आनि जप । पंचेंद्रिया आवरी कोप । सिद्धस्वरूप तोचि मार्ग ॥९९।। एवं चार ह्या आराधना । आराधना श्री जिनचरना । चंद्रा द्यावी मोक्षमार्गणा । शरण शरणा सिद्धपदी ।।१००। तेरा अध्याय ते ज्ञानाचे । तितुकेचि जाना चारित्राचे । सम्यक् आराधना तपाचे । अध्याय तेराच संपूर्ण ॥१०१।। बावनपुष्पाची हे माळा । श्रीजिनदेवापदकमळा । जावया मोक्षाचे राउळा । चंद्रकीर्ती भोळा इच्छितसे ॥१०२।। मम इच्छा सर्व संपूर्ण । केली देवाधी त्या देवान । पुढती करी संपूर्ण । निश्चय मन साक्ष तोचि ।।१०३।। कथा कवित्व अल्पमति । सज्जनि सांभाळा सम्यक्त्वी। लघुदीर्घ व्यंजनयुक्ती । कान्हा-मात्रा-शांति क्षमाभाव ।।१०४।। श्रोता सज्जन ज्ञानपंडित । देवपूजेसी अखंडित । त्या सर्व सुख अखंडित । शास्त्रयुक्त धर्मानुसारे ।।१०५।। इति आराधनाकथाकोश । ऐकता सर्व पापाचा नाश । श्रोता वक्ता सदा निर्दोष । सुखसंतोष सदा सर्वदा ।।१०६।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org