Book Title: Aradhana Kathakosha
Author(s): Bhattarak Chandrakirti, Shantikumar Jaykumar Killedar
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
View full book text
________________
७१६ । आराधना-कथाकोष
ते घ्यावया पोहत पोहत । नागकन्या त्यासी रक्षित । रे रे गोपाळ सांग सत्य । पुष्प कवनात नेसी तू ॥९॥ सर्वोत्कृष्ट देवासी प्रिय । मिथ्यातिसी न देउ स्वय । देवसेवक मीच होय । ही फूलमाळ मज देई ।।१०॥ सहस्रदळ पुष्पकमळ । घेवोनिया करकमळ । श्रेष्ठीपासी आला चंचळ । वृत्तान्त सकळ निरोपि ।।११।। युगुळ गेले रायापासी । सर्व वृत्तान्त सांगति त्यासी । पुष्प सुवास गगनासी । राजा मानसी विचारित ।।१२।। उत्कृष्ट ऐसा देव कोण । त्यासी पुष्प हे समर्पण । गोपाळा नागिनी दर्शन । महत्पुण्य यास भाग्याचे ॥१३।। सहस्रकूट चैत्याल्या जाउ । श्रीवर्धमान पाय पाहू । गुरूचे चरण वंदाउ । सभा समुदाय चालले ।।१४।। नि:परीत्य देवागुरूसी । नमोस्तु त्रिवार पंचागेसी। पुढे भेट अष्टद्रव्यासी । श्रीफळासि रत्न हेमादि ॥१५।। पृच्छा करि जोडोनी कर । उत्कृष्ट देव त्र्यैलोक्यावर । हेमपुष्प त्याचे चरणावर । पद्मिनी उत्तर गोपाळा ।।१६।। हे सांगावे जी आम्हाप्रती। श्रीपूज्य गुप्ताख्य चंद्रकीर्ती । मधुर गिरा वचन युक्ती । भो क्षितिपति श्रुणु वत्स ।।१७॥ श्रीदेवाधिदेव अरिहंत । अनंतानंत कीर्तिवंत । वीतरागदोषवजित । उत्कृष्ट तयात जानिजे ॥१८॥ ते ऐकोनिया समुदाय । मुखे वदति जय जय । सर्वोत्कृष्ठ श्रीजिनराय । पुष्प वहावे जिनपदी ॥१९॥ तेव्हा तो धनदत्त गोबळ । कमली घेवोनी कमळ । सर्वोत्कृष्ठ दीनदयाळ । घ्यावे परिमळ पुष्प तुम्ही ॥२०॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org