Book Title: Aradhana Kathakosha
Author(s): Bhattarak Chandrakirti, Shantikumar Jaykumar Killedar
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
View full book text
________________
७२८ : आराधना-कथाकोष
पुत्र माता त्या पितियासी । भेट जाली द्वादशवर्षी । पुत्र धरोनिया पोटसी । आलिंगिता त्यासी सद्गद्गद् ।।१५२।। सज्जनी केला जयजयकार । आनंदभेरी मंगलाचार । पुत्र विभूती विद्याधर । दाटी फार गगनपंथ ॥१५३।। चंपापुरी प्रवेश केला । अष्टविध देव पूजिला । अन्नदान तुर्यसंघाला । वस्त्राये केला सन्मानविधी ।।१५४।। पद्मावती प्रसादेन । पद्माराणी सुखसंपन्न । पुत्रपौत्रादि धनधान्य । पूर्वपुण्यान सर्वसुखी ।।१५५।। कित्येक दिवसानंतर । करकंडु यौवनभर । विद्याधर परमादर । कन्या सुंदर सहस्राष्ट ।।१५६।। विधियुक्त विवाह जाले । पृथ्वीराजे सर्व मिळाले । दंतीवाहन विनवीले । ज्यामात केले करकंडु ॥१५७।। दहा सहस्र सुंदर कन्या । महाविभूती वाद्ये नाना। दिव्य षोडशाभरणा । कृष्णगोपांगना अधिक ॥१५८।। अठरा सहस्र युवती । रानी स्थापिल पुत्राप्रति । एकछत्री ते राज्य करिती । प्रजा पाळिती पुत्रवत् ॥१५९।। परिवार समस्त मिळोन । नित्य देवाचे दर्शन । पूजाविधी युक्त करोन । नवविधा पुण्य पुण्येन पै ॥१६०।। तदा मंत्री वदे रायासी । प्रणाम करी विनयासी। एक सांगतो मी तुम्ही । चरमाख्य राजासी जिंकावे ॥१६१|| तो बळ पद गर्वी थोर । पांड्याश्चळा असती पुर । तो देत नाही करभार । आश्रित वीर गडकिल्ला ॥१६२।। ऐकोनी प्रधानाची मात । दूत धाडिला त्या त्वरित । न मानि या राजवित । परतला दूत तत्क्षणी ॥१६३॥
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org