Book Title: Aradhana Kathakosha
Author(s): Bhattarak Chandrakirti, Shantikumar Jaykumar Killedar
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur

View full book text
Previous | Next

Page 761
________________ ७३६ : आराधना-कथाकोष चैताळयावरौत चैताळ । भावार्थे कळे ज्ञानबळ । त्याचे निरोपण सकळ । कथा समूळ परिसावी ॥२४८।। तेथेच सुवेग श्रावक । धनादि रत्न अमोलिक ।। रत्नप्रतिमा केली भाविक । तो सात्विक परि अर्थध्यानी ॥२४९।। मरोनी जाला हस्ती बनी। रत्नबिंब ते ज्या ठिकानी । सुंडा दंड नित्य पानी । भाव धरोनी कमळपुष्प ।।२५०।। तोय पुष्प पूजा करीत । करकंडु येईल तेथ । हस्ती पाहून विस्मित । पेटारी हस्त काढील तो ।।२५१॥ हस्ती सर्व संन्यास करील । राजा त्यासी धर्म सांगेल । मग जे जे पुढे होईल । ते ते पाहशील राजिंद्रा ।।२५२।। ते ऐकोनिया मुनी वाणी । विद्याधर संतोष मनी । स्वामिसी नमोस्तु करोनी । चैत्यात्ये कोन्ही केले सांगा ॥२५३।। धारासीव पुण्याचे क्षेत्र । अतिशय तीर्थ पवित्र । सहस्र स्तंभ रंग विचित्र । भव्यसी मात्र पुण्यदाता ॥२५४।। ऐसे द्रव्य चिल कोन्ही । ते सांगावे कृपा करोनी । वदते जाले महामुनी । मधुर वानी करोनिया ॥२५५।। विजयार्द्ध दक्षिण दिशी । रथनपूर शुभ वस्तिसी। नीलमहानील यशस्वी । जितिले पृथ्वीसी धनाढये ॥२५६।। सप्त क्षेत्री धन खर्चावे । जिन चैत्यालय बांधवावे । ते आले येथे भव्यजीव । हे अपूर्व सहस्रस्तंभ ॥२५७।। कित्येक दिवस राहोन । करोनिया पुण्य कारण । महाअभिषेक करोन । शीघ्रगमन विजयार्धासी ॥२५८।। तेव्हा ते दोघे खगेश्वर । नील महानील चतुर । घेवोन दीक्षा तपशूर । स्वर्गमंदिर सर्वसुखी ॥२५९।। Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 759 760 761 762 763 764 765 766 767 768 769 770 771 772 773 774 775 776 777 778 779 780 781 782 783 784 785 786 787 788 789 790 791 792 793 794 795 796 797 798 799 800 801 802 803 804 805 806 807 808 809 810 811 812 813 814