________________
७३६ : आराधना-कथाकोष
चैताळयावरौत चैताळ । भावार्थे कळे ज्ञानबळ । त्याचे निरोपण सकळ । कथा समूळ परिसावी ॥२४८।। तेथेच सुवेग श्रावक । धनादि रत्न अमोलिक ।। रत्नप्रतिमा केली भाविक । तो सात्विक परि अर्थध्यानी ॥२४९।। मरोनी जाला हस्ती बनी। रत्नबिंब ते ज्या ठिकानी । सुंडा दंड नित्य पानी । भाव धरोनी कमळपुष्प ।।२५०।। तोय पुष्प पूजा करीत । करकंडु येईल तेथ । हस्ती पाहून विस्मित । पेटारी हस्त काढील तो ।।२५१॥ हस्ती सर्व संन्यास करील । राजा त्यासी धर्म सांगेल । मग जे जे पुढे होईल । ते ते पाहशील राजिंद्रा ।।२५२।। ते ऐकोनिया मुनी वाणी । विद्याधर संतोष मनी । स्वामिसी नमोस्तु करोनी । चैत्यात्ये कोन्ही केले सांगा ॥२५३।। धारासीव पुण्याचे क्षेत्र । अतिशय तीर्थ पवित्र । सहस्र स्तंभ रंग विचित्र । भव्यसी मात्र पुण्यदाता ॥२५४।। ऐसे द्रव्य चिल कोन्ही । ते सांगावे कृपा करोनी । वदते जाले महामुनी । मधुर वानी करोनिया ॥२५५।। विजयार्द्ध दक्षिण दिशी । रथनपूर शुभ वस्तिसी। नीलमहानील यशस्वी । जितिले पृथ्वीसी धनाढये ॥२५६।। सप्त क्षेत्री धन खर्चावे । जिन चैत्यालय बांधवावे । ते आले येथे भव्यजीव । हे अपूर्व सहस्रस्तंभ ॥२५७।। कित्येक दिवस राहोन । करोनिया पुण्य कारण । महाअभिषेक करोन । शीघ्रगमन विजयार्धासी ॥२५८।। तेव्हा ते दोघे खगेश्वर । नील महानील चतुर । घेवोन दीक्षा तपशूर । स्वर्गमंदिर सर्वसुखी ॥२५९।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org