________________
प्रसंग एक्कावन्नावा : ७३५ अन्नोदक करा पारण । हृदयी रत्नबिंब आणोन । अष्टविध पूजा करोन । नागकुमरान जेवविला ॥२३६।। दोघे बैसले एकांतासी । राव पुसे नागदेवासी। कोने निर्मिले चैत्याल्यासी । रत्नाविबासी अनुपमे ।।२३७।। वरौत वारुळामध्ये स्थानी । प्रतिमा ते पापनाशनी । पेटारी ठेविली कवनी । सांगा वदनी नागदेवा ॥२३८।। ऐक राया तू एकाग्रेसी । विजयार्द्ध उत्तर दिशी । नभतिलक ग्रामवासी । सुखसंपत्तिसी नरनारी ॥२३९॥ तेथे राजे दोघे सज्ञान । अमितवेग सुवेग भान । देवगुरूपदी तल्लीन । षट्कर्माचरण नित्यशः ॥२४०॥ ते दोघे जन भक्तिवंत । तीर्थयात्रे मनइच्छित । वंदिता ते आर्यखंडात । देखिले येथे जिनालय ॥२४१॥ वंदना पूजना करोनी । चारू पर्वत पाहे नयनी । तेथे रत्नबिंब कोटकीर्नी । पाहता नैनी संतोषले ॥२४२।। पूजा वंदना तया तेथ । बिंब ठेविले पेटारीत । उचलिता न उचलत । बहुयत्नात करिती ते ।।२४३।। महाक्षेदक्षीण जाहले । त्यावरी वारूळ वाढले । विद्याधर तेरपुरा गेले । वर्द्धमान पूजिले भक्तीन ।।२४४।। तेथे ज्ञानकीति मुनींद्र । अवधिज्ञानी कीर्तिचंद्र । नमोस्तुते त्रिहृदयांद्र । आशीर्वाद समग्र ऐकिला ॥२४५।। तेथे खग हस्त जोडिती । स्वामिराया पृच्छा करिती । धारासीव वृत्तान्त सांगती । रत्नमूर्ती त्या मंजूसात वो ॥२४६।। अवधीज्ञानी मुनीराये । अहो खगाधीप ऐकावे । मंजूसी रत्नप्रतिमा आहे । सर्वसुख साह्यकारिनी ॥२४७॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org