Book Title: Aradhana Kathakosha
Author(s): Bhattarak Chandrakirti, Shantikumar Jaykumar Killedar
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
View full book text
________________
६६२ : आराधना-कथाकोष
एके दिवसी विपरीत । काय वर्तल त्या ग्रामात । भिल्ल चेतविले अग्नीत । कोल्हाळ बहुत जाहला ।।१०।। तदा ते जिनमती सती । बोले भ्रतारा यावो आर्ती । तुमचे देव ते सत्यार्थी । अग्निशांति बोलवा तुम्ही ॥१०१॥ तेव्हा तो ज्ञान अभिमान । सर्व जना साक्षी करोन । कुळदेवता आराधून । प्रार्थना मौन करीतसे ॥१०२।। ब्रह्मा विष्णु महेश्वरा । अर्घ्य देतसे ऋषेश्वरा । शांति नोव्हेच वैश्वानरा । ग्राम तो सारा भक्षु पाहे ।।१०३॥ पाहोनी जिनमती सती । धर्मवत्सला एकाग्रचित्ती । पंचनमोकार मंत्रोक्ती । अर्घ्य अचिती अष्टविध ॥१०४॥ न्हवन स्तवन गंधोदक । जप जाप्य जिननानक । आरती विसर्जन सर्वलोक । गंधोदक वंदिती सर्व ॥१०५॥ तेव्हा ते जिनमती बाळा । अग्नीस अर्घ्य एक दिला । गंधोदक शिपिती त्याला । शांत जाला वैश्वानर ॥१०६॥ धर्म अतिशय देखोनी । जयजय शब्द वदति वाणी । रुद्रदत्त आदि करोनी । सत्य सत्य जिनवाणी सत्य ते ॥१०७॥ रुद्रदत्त पुत्रासहित । टाकोनिया मिथ्यामतात । अंगिकारोनी जिनमत । सत्य सम्यक्त्व जैनधर्म ॥१०८॥ अहो हो हा श्रीजिनधर्म । भुवनत्रयी असे उत्तम । असती त्या मोक्षधाम । सौख्य उत्तम अनंतानंत ॥१०९।। यथा जिनमती श्रावकीण । तथास्तु सम्यक्त्वरक्षण । ज्ञाते पंडित भव्यजन । आत्मसाधन भमंडळी ॥११०॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org