Book Title: Aradhana Kathakosha
Author(s): Bhattarak Chandrakirti, Shantikumar Jaykumar Killedar
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
View full book text
________________
प्रसंग अन्ठेचाळीसावा : ६६५ राज्यपद श्रेणिकासी । निश्चय होईल तयासी । पाहोनी उपश्रेणिकासी । चिंता मानसी अनिवार ॥१३३।। पुण्यानुसार नरदेह । बुद्धी कर्मानुसार होय । अग्नि शांत जाल्यावर । सेवका स्वय पाचारूनी ॥१३४॥ जानोन राय चित्तात । मम शब्द नव्हे सत्यार्थ । प्रपंच धरोनी मनात । दोष तयात कर्कराचा ॥१३५॥ स्वानादेखत जेविला । तोचि अंतराय तयाला । हा तो न लगेचि आम्हाला । बाहेर घातला प्रधान ॥१३६।। दोषरहित तो श्रेणिक । वनवासी एकला एक । भ्रमता बुधीचा विवेक । ग्राम एक पाहिला त्यान ॥१३७॥ गभस्ती आला दोन प्रहर । क्षुधाग्नि उत्पन्न उदर । नंदीग्राम तेथे ते विप्र । नंदीचे तीर विद्याघोष ॥१३८॥ ते ब्राह्मण विद्यागविष्ट । मनुष्यावर न दे दृष्ट । अंगी मदगज तो श्रेष्ठ । सर्वश्रेष्ठ ब्राह्मण आम्ही ॥१३९।। क्रोधे पुढे चालला जेठी । संन्याशाच्या बैसला मठी । विष्णुशाळा पाहोनी दृष्टी । भोजन संतुष्टी तृप्त जाला ॥१४०॥ तत् तयाच ज्ञान ऐकोन । विष्णुधर्म घेतला त्यान । पुढती दक्षिणा देईन । चालला त्वरेन पुढती ॥१४१॥ दक्षिण देश कांचीपुर । वसुपाळ राजा धर्मवीर । राणी वसुमती सुंदर । कन्या सुंदर वसुमत्या ॥१४२।। सोमश्रमा ब्राह्मण मंत्री । तप्रिया ब्राह्मणी सोमश्री । अभयमती तयाची पुत्री । कमळनेत्री विचक्षणा ॥१४३।। तदा सोमश्रमा ब्राह्मण । तीर्थयात्रा गंगास्थान । परतोनी येता मार्गान । देखिला नयन श्रेणिक ।।१४४।।
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org