Book Title: Aradhana Kathakosha
Author(s): Bhattarak Chandrakirti, Shantikumar Jaykumar Killedar
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
View full book text
________________
६३२ : आराधना-कथाकोष शुक म्हणे सावध धनी । पंथिक धनवंत आला कोन्ही । आपुले हित करावी करणी । ते राय ऐकोनी सावध ।।१६७।। पंथ सोडोन दूरस्थ । चालला त्वरे तो बंदोबस्त । कुसंगतीन त्या राव्यात । वैचप्रप्त हित आत्म्याचे ।।१६८।। तेव्हा राजा तो हरिसेन । निघता जाला तो त्वरेन । पाहिले तापसाचे ते वन । गुंफा विस्तीर्ण देखिली पै ॥१६९।। तेथे पक्षीरावा तो होता । हरिसेन पाहिला दुरस्ता । राघो म्हणे वो गुरूनाथा । गुणी जन ज्ञाता येत आहे ।।१७०॥ ते ऐकोनीया हरिसेन । पुसता जाला त्या कारण । म्हणे आमचे गुणज्ञान । कैसे नयन वोळखिले ॥१७१।। राघो म्हणे ऐकावे देवा । सुसंगतीने ज्ञानठेवा । कुसंगतीने पाप जीवा । दुष्टभावा कुबुधी प्राप्त ।।१७२।। तो श्रुकमी सखेचि बंधू । त्यास घडला दुष्ट संबंधु । भम गुरू तो ज्ञानसिंधु । मज केला बोध गुरूराये ॥१७३।। गुरुकृपे ज्ञान मात जाले । दूरस्थ तुम्हासी वोळ खिले । चार दिन तेथे कर्मीले । प्रसंशील मुनी त्यासी ।।१७४।। तत् तापसाची पूर्व कथा । श्रवण करावी पुण्य श्रोता । अज्ञानपन लिहिले ग्रंथा। न्यून पदार्था पूर्ण करा ।।१७५।। तत् संबंधी चंपानगर । शतमनु तेथे राज्यधर । स्त्रिया नागवती सुंदर । मनोहर ते शीळवंती । १७६।। रत्नत्रय ते व्रतधारी । षट्कर्म त्या हृदयांतरी । काडनी पिछनी सोधी नीरी । संमार्जन करी शास्त्रयुक्त ।।१७७।। पात्र शुधी अग्नी प्रदीप्त । षविध दया धर्मवंत । गुरू आज्ञा प्रतिपादित । जिनगुणसंपत् षड्गुणी ॥१७८॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org