Book Title: Aradhana Kathakosha
Author(s): Bhattarak Chandrakirti, Shantikumar Jaykumar Killedar
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
View full book text
________________
प्रसंग अडतीसावा : ५१५
या नावे सम्यक्त्व लक्षण | संसारी जीव श्रावकजन | व्रती अष्ट मूळगुण | क्रिया तिरुपण पाळताती ॥२९॥ जिनभाषित शास्त्रयुक्ती । श्रावक धर्म आचरती । गुरूपासी नेम घेताती । चालविती शक्तिसारते ||३०|| दयादीधर्मं ब्रह्मचर्यं । शीलव्रती तत्पर होय । ज्ञानध्यानाची जाने सोय । काळाध्यय सिद्धान्तमार्ग || ३१ ॥ गुरु जानावा तो निग्रंथ । भार्यादि ग्रंथी विवर्जित । कुमंडल सौचविधीत । पिछी धरित जीवाची दया ॥३२॥ जग उपदेशाकारण । शास्त्रसंग्रह करिती जान । तप तीव्र पंच ते आग्न । करिति साधन मुनीराय ||३३|| उष्ण शीत पर्जन्यआग्न । हे बाह्यात्कारा तीन आग्न । आंतरी ते क्षुधातृषाग्न । करिती साधन साधूते ||३४|| इत्यादी धर्म समस्त । रेणुका ऐकोनिया स्वस्थ । आनंद जाला हृदयात | लागली प्रीत जैनधर्मी ||३५|| म्हणे दादा हे सत्य सत्य । सांगीतले जीवाचे हित । तयन घेवोन सम्यक्त्व | केला बंधुत नमस्कार ||३६|| बंधुसी जाला हर्ष फार । प्रज्ञप्ति विद्या महाथोर । देता जाला मन उदार । दयाकर मुनीराज ते ||३७|| कामधेनु देवोनी तीसी । सुखी असावे वनवासी । गेली आपुले स्थानकासी । जमदग्नीसी सर्व सुखी ||३८|| देव गुरू शास्त्रसंपन्न । नित्य नित्य त्या धर्मध्यान । कामधेनु सदृश पक्वान । संतोशमन धर्मं करिती ||३९|| एकदा अयोध्येचा पती । कार्तवीर्य तो भूपती । 1 वनक्रीडा करायाप्रती । धरावया हत्ती आला तेथे ॥ ४० ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org