Book Title: Aradhana Kathakosha
Author(s): Bhattarak Chandrakirti, Shantikumar Jaykumar Killedar
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
View full book text
________________
५४० : आराधना-कथाकोष मनवांछित दिधला वर । वीर शूर तो अतिथोर । वैरी जितिला प्रतापसूर । विजयी कुमर जाहला ॥९॥ बळ मद चढला भारी । विषयांध जाला शरीरी । भोगलंपट परनारी । दुराचारी सप्तव्यसनी ॥१०॥ श्लोक:-कामातुराणां न भयं न लज्जा। अर्थातुराणां न पिता न बन्धु । क्षुधातुराणां न बलं न लज्जा। चिंतातुराणां न बुद्धि न निद्रा ॥११॥ . धिक् कामांध दुराचारी। पाप दुर्धर परनारी । श्रावकनारी ते सुंदरी । बळात्कारी तो भोगईछा ।।१२।। श्रावकामनी क्रोध फार । बळ न चाले त्यासमोर । तो गावचा धनी पुत्र । त्यासी वैरत्व लाउ नये ।।१३।। कित्येक दिवसानंतर । केवळज्ञानी जिनेश्वर । समोशरन गिरीनेर । आले समय वंदनेसी ॥१४॥ द्वारकेचे जन मिळोनी । पूजाष्टविध ते घेवोनी । जै जै शब्द उच्चारोनी । विंद्र मळनि भुवनत्रय ॥१५॥. बळदेव तो वासुदेव । वज्रकुमारादि ते सर्व । छप्पनकोडी ते यादव । पूजिती देव अष्टविधा ।।१६।। स्तुत्वा नत्वा महाभक्तीन । सन्मुख बैसले कर जोडोन । द्विविध धर्म केला श्रवण । वैराग्य मन मोक्षमार्ग ॥१७॥ ते ऐकोन गजकुमार । त्रिधा वैराग्य त्या अंतर । धिक् धिक् आता संसार । पापभार अष्टकर्माचा ॥१८॥ स्वामिपासी दीक्षा घेवोनी । क्रूर तप पापनाशिनी । विहार करिती मेदनी । आले वनी गिरनारीचे ॥१९॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
-
www.jainelibrary.org