Book Title: Aradhana Kathakosha
Author(s): Bhattarak Chandrakirti, Shantikumar Jaykumar Killedar
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
View full book text
________________
४५० । आराधना कथाकोष
मुनि म्हणे ऐक सखया । तव मन स्थिर व्हावया । जे आवडेल त्वं हृदया। सांगावि त्वया रसिककथा ॥७८॥ श्रेष्टि सांगे कर जोडोन । कथा ऐका चित्त देवोन । पद्मरथपुर विस्तीर्ण । राजा बळवान वसुपाळ ॥७९।। तयाचा जितशत्रुदूत । कार्यासी पाठवि देशात । मार्गी जाता घोर वनात । तृषा तयात लागली ॥८०॥ पाणि न मिळे तयाला । तहाने प्राण व्याकुळ जाला । एक्या वानेर पाहिसा । दयाळ आला तयापासी ।।८।। उदक आनोन शिंपले । सावध होवोनि बैसले । वानरे हस्तकी धरीले । तोए दाखविले जीवित ॥८२॥ पाणी पिऊनि धीट झाला । कपिचा त्याने घात केला। तो भयाभीता जाला भला । त्वरे गेला वृक्षावरौता ॥४३॥ पापी इच्छा करी मन । या वानरासी मारोन । याचेच चर्म काढोन । थैलि करोनी पाणी नेऊ ॥८४॥ किम स्वामी ऐसे करावे काय । प्राण वाचविला ते माय । तयासि घालोनय घाय । उपकार हृदये समजावा ॥८५॥ कथा १॥ ऐकोनी मुनि वदे त्यासी । उपकार न जाणे श्वभ्रवासी। ज्ञानाधन जाणे कर्मासि । त्याचीविषयी कथा ऐकावी ॥८६॥ अहोहो श्रोते सावधान । एक कौशंबी नगरोत्तम । विप्रशिवशर्माऽभिधान । स्त्री कपिलाहीन पुत्रनास्ति ॥८७॥ एकदा त्या ब्राह्मणासी । मुंगसबाळ सापडे त्यासी । ते आणोन दिल्हे स्त्रीपाशी । पुत्र स्नेहासी पाळी गे ॥८८॥ कित्येक दिन जाल्यावरी । पुत्र प्रसवही ते नारी । नकुळास बैसवी त्याशेजारी । जतन करीले बंधुसी ॥८९॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org