Book Title: Aradhana Kathakosha
Author(s): Bhattarak Chandrakirti, Shantikumar Jaykumar Killedar
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
View full book text
________________
४५४ : आराधना-कथाकोष
तिने विचारिले मानसी । तिने दिले जेष्टपुत्रासि । पुत्राने दिधले पित्यासी । तीर्थरूपासी अमर व्हावे ।।१२६॥ नृप वदे हे स्त्रीवेल्हाळे । त्वा भक्षावे अमृतफळे । प्रीत पाहोन सकुमाळे । भक्षिले फळ जिनस्मरणे ॥१२७॥ भक्षिता विष व्यापतअंगी । व्याकुळ जालि सुंदरांगि । कोल्हाळ जाला पर्वारसंगि । धनवंतरि वेगि वैद्य आले ॥१२८॥ वदति विषफळ सत्य । क्रोधोत्पन्न जाला रायात । अविचार छेदि वृक्षात । स्त्रीसावध मंत्र युक्त ।
वृक्ष दुःखिस्थ जाहाला ॥१२९ भो श्रेष्टि तैसि राययुक्ती । क्रोध न करावा सम्यक्ती। मुनिराय वचनगुप्ती । कुबेरदत्ताप्रती सूचन ॥१३०॥ कथा ६ ॥ तैस न करावे रायान । कथा ऐका चित्त देवोन । कोन्ही नर बुद्धीवान । महा अरण्य गेला कृत्यासी ॥१३१॥ सिंह देखिला भयानक । त्वरे चढला वृक्ष एक । प्राण वाचला जाल शुष्क । उतरला भूमिके तो नर ॥१३२॥ त्याने पाहोन त्या वृक्षासी । म्हने तोडोन न्यावे यासि । फत्तर घेवोनिया त्यासी । तोडि मूळासि दुष्टबुधी ॥१३३॥ ज्यान वाचविला देहे प्राण । त्याचे करावे काय हनन । उपकार न मानि तो दुर्जन । त्याचे वदन न पाहावे ॥१३४॥ अहो स्वामि ऐसे त्याने करावे । हे मजला तुम्ही सांगावे । जेथे वाचला त्याचा जीव । त्याते दुखवावे योग्य नोव्हे १३५कथा७ स्वामि म्हने भले श्रावक । कथा केलि दुःखदायक । मूर्ख न जाने जो विवेक । तयाचे मुख पाहो नये ॥१३६।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org