Book Title: Aradhana Kathakosha
Author(s): Bhattarak Chandrakirti, Shantikumar Jaykumar Killedar
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
View full book text
________________
प्रसंग छत्तीसावा ! ४७५ मम कन्या अंगीकार करा । चालवावे ह्या राज्यभारा । वसुदेव विचारी अंतरा । नवरी नोवरा घटित नाही ॥१०४॥ यादव म्हणे ऐका वचन । वैरी जितिला यादवान । कंसवीर महा बलवान । आनिला बांधोन रथावरी ॥१०५॥ वचन प्रमाण करा आता । कंसवीर महा ज्ञाता। कन्या द्यावी तुम्ही त्वरिता । केला भर्ता जीवंजसेसी ॥१०६॥ थोर समुदाय मिळाला । स्वयंवरा मंडप दिधला । कन्या देवोनी कुळाला । विचारी त्याला राजिंद्र तो ॥१०७॥ अहो हो महावीर कंस । सांगा तुमचा कोन वंस । माता पिता ग्राम वास । सत्य आम्हास सांगावे ॥१०८॥ कंस ह्मणे माझी माय । कौसंबी नगरामध्ये आहे । प्रधान पाठविले लवलाहे । कोटपाल स्त्रिय पुसती ।।१०९।। कंस पुत्र तुझा सत्य । हे सांगावे यथातथ्य । ते होवोनी भयाभीत । कांस मादुसात दाखवी ॥११०॥ पेटारी पाहे तो प्रधान । नाममुद्रा देखिली त्यान । उग्रसेन पुत्र पुण्यवान । विख्यात जैन राज्यकुळी ।।११।। तेव्हा ते घेवोनी पेटारी । घेवोन आले राजमंदिरी । उग्रसेन सभेभीतरी । नमन करी प्रधान त्या ।।११२॥ कांसमंजूस पाहोनिया । रत्नकांबळा उघडोनिया । नाममुद्रिका घेवोनिया । पाहिले तया पत्रिकेसी ॥११३|| मथुरे राजा उग्रसेन । तत् मुद्रिका पुत्र सगुण । जरासंध संतोष मन । पाणिग्रहण महोत्साव ॥११४॥ विवाहविधि पंचदिवस । अन्नदान सुपात्रास । यति अजिका श्रावकास । याचकास यथाविधि ॥११५॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org