Book Title: Aradhana Kathakosha
Author(s): Bhattarak Chandrakirti, Shantikumar Jaykumar Killedar
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
View full book text
________________
३९० : आराधना-कथाकोष
देवरति म्हणे वो स्त्रिये । तुमी आसता उने काय । पुढे मी करीन उपाय । शांत तू होय गे सुंदरी ॥७९॥ परी ते स्त्री कौटातीन । पंगुसी रातलि दुर्जन । तातफुलं माळा गुंथून । गळाग्रहण तेन केले त्या ।।८।। यमुनानदी भयंकर । त्यात लोटला राज्यधर । पंगुचा केला अंगीकार । स्त्रीचरित्र ते पापरूपी ॥८१।। स्त्रीचि संगत महाखोटी । शरीर गळील तीजसाटी। परि ते आंतरची कपटी । विषयलंपटी भ्रतारा वधी ॥८२।। तेव्हा तो देवरति भूप । नदीत पडला जैसा साप । वाहात चालला कर्मरूप । पापमाण महान् दुःखी ।।८३॥ जैनधर्म पूर्वी किंचित केला । सद्धर्म तारु त्यासी जाला । भोपळा यासि सापडला । पोटासी धरला तयाने तो ।।८४॥ मग तो चालला वहात । एक रात्र श्रम बहुत । इदई आठवी भगवंत । तारु सत्य सत्य श्रीगुरू ॥८५।। मंगळावती ग्राम जेथे । राजा उतरला पानवठे । खैर केली श्रीजगन्नाथ । श्रीगुरू सत्य जिनधर्मी ॥८६।। जानोनिया मी पाप केले । ते ते भोगणे प्राप्त जाले । पापी स्त्रियचि चित्त लाविले । शेवटी लोटले जळात ॥८७॥ धिक् धिक् संग स्त्रियेचा । आता नेम हाचि आमचा । मुखडा न देखु तियेचा । सत्य सत्य वाचा सम्यक्त्व ।।८८।। ऐसा नेमनिछे करोनी । वृक्ष छायातळि बैसोनी । हृदइ आठवी जिनवाणी । गुरूराज मुनितारक तू ।।८९।। त्या ग्रामी राजा श्रीवर्धन । मरण पावला पुत्रावाचून । ग्राम सुन राजावाचुन । करि प्रधान विचार मनी ॥९०॥
www.jainelibrary.org
For Private & Personal Use Only
Jain Education International