Book Title: Aradhana Kathakosha
Author(s): Bhattarak Chandrakirti, Shantikumar Jaykumar Killedar
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
View full book text
________________
प्रसंग सत्तावीसावा : ३७१
राव म्हणे प्रधानासी । जे असेल ते देइ यासी । ब्राह्मण वदे रायासी । तत् सेवकासी काय उने ॥३३॥ हा गळापडु दिसे चोर । यास घाला रे बाहेर । मग तो नगरितच फिरे । मुखी उच्चार पंचरत्न ||३४|| म्हणे माझी पंचरत्न । आभिळासिली प्रधानान | राजम्हाला खाले बैसोन । रात्र माध्यान काळोंकीते ||३५|| रामदत्ता राजप्रिया । म्हणे ऐका मम धणिया । न्याय केला पिशाश्चतया । परि तो वाया न वदेचि ॥ ३६॥ षडमासपर्यंत । यकचि वचन हा वदत ।
1
वेड तरि बहु जल्पत । हा सत्यरत्न सत्य याची ||३७|| राया तुम्हि पाहावा न्याय । याचा करीन मी उपाय । बुधीयुक्ति पाहे सोय । जाला उदय दिनकर ||३८|| त्या वणिका बोलाऊन । त्यास पुसे सत्यवचन ! तो म्हणे गेल्या जरि प्राण । असत्य वचन न बोलु ||३९||
महा दोष असत्याचा । बाई जईन धर्म अमचा । विचार याचानी आमचा । घ्यावा यशाचा कीर्तिशब्द ||४०|| सर्वत्राचि जालि भोजन । प्रधान आनिला बोलाऊन । तयासी पुसे सत्यवचन | काय भोजन तुम्ही केले ॥४१॥ ज्ञानमद करोनिया । बरवे न सांगे पापिया । तोचि तोचि शब्द जानोनि । करि उपाया सीताप्रीय || ४२ ॥ राजा राणी आनी तो भट । तिघे खेळति सारिपार्ट । डाव मांडला से अचाट | फासे कपट स्त्रीचरित्र ||४३|| प्रथम जिंतिला तो राजा । मग त्या पाचारि हो द्विजा । पैज बांधली डाव माझा । जिंतिला सहजा ब्राह्मण ॥४४॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org