Book Title: Aradhana Kathakosha
Author(s): Bhattarak Chandrakirti, Shantikumar Jaykumar Killedar
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
View full book text
________________
प्रसंग विसावा : २५७
कपिला म्हणे तुम्हा पुत्र । रूपवंत गुण पवित्र । सेटि म्हणे हे स्त्रीचरित्र । मज तिळमात्र नसे ठावे ॥१०५॥ बाई तुला सांगतो एक । मला तुला स्त्रीला ठाउक । कोन्हा सांगु नको आनिक । अवगुण झाक माझा बाई ।।१०६॥ . ऐसे बोलोनिया त्वरे । गेला आपुल्या स्वमंदिरे । ज्ञाना सिकतसे नित्य पुत्र । ज्ञानसूत्र आगमसिद्धांत ॥१०७॥ एके दिवसी वसंत आला । राजा वनक्रीडेस चालला । सवे घे अभयमतिला । नरनारि निघाल्या सर्वही ॥१०८॥ कपिला रथावरि बैसोन । मनोरमा सेटि सुदर्शन । सुकांत पुत्र गुणवान । ते रथी बैसोन चालले ॥१०९।। त्या मनोरमासि पाहोन । राज्ञी म्हणे हे नारि धन्य । भर्ता जिएचा सुदर्शन । पुत्ररत्न प्रसवली हे ॥११०॥ कपिला म्हणे बाइ ऐकावे । सुदर्शनाचा पुत्र नोव्हे । राज्ञि म्हणे तुज काय ठावे । सर्वही सांगावे आम्हासी ॥१११॥ राणीस सर्वही सांगोनि । तव ते म्हणे तुम्ही भटनी । तुला गेला गे ठक उनी । निश्चय करून भोगीन मी ।।११२।। सुदर्शना देखती जाली । स्वरूप पाहता भुलली । मदनबाण व्याकुळ झाली । मूच्छित पडली धरणीय ॥११३॥ मग सावरोनि आपनात । वरपंगि खेळे वसंत । क्रीडा करोनिया समस्त । आले ग्रामात सर्वही ॥११४॥ राणीहृदयी कामबाण । विरहज्वर ज्वाला उत्पन्न । पलंगी पहुडे कामीण । दाई येवोन पुसे तीयसी ।।११५॥ हे कन्निके काय जाले । सांग मजला तू वहिले । कोन्ही तुला काय बोलले । किं दुःखी झाले तुझे मन ॥११६।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org