Book Title: Aradhana Kathakosha
Author(s): Bhattarak Chandrakirti, Shantikumar Jaykumar Killedar
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
View full book text
________________
२५६ : आराधना-कथाकोष
आ गे महासीळवंत । त्याचा मैत्र तो तुझा कांत । जैनधर्मी पुण्यवंत । परनारि संत सहोदर ॥९३॥ सखि म्हणे स्त्रीचरित्र । स्त्रीस भुलले इंद्रचंद्र । ब्रह्मा विष्णु आणिक रुद्र । महाऋषींद्र तपस्वी ॥१४॥ मानवाचा केवा कोन । तू आहेस गे सर्वज्ञान । काही चतुराइ करोन । मम मन मदन शांत करी ॥९५॥ तेव्हा ते सखि मनरंजनी । कपिला गेली कार्यालागुनि । तेच सनंद पाहोनी । चालली भुवनी मैत्राचे ॥९६॥ एता देखीकि सुदर्शन । कशास बाई केले येण । तुमच्या मैत्रास आल दुखण । निष्ठुर मन बहु तुमचे ॥९७॥ तुम्हास त्यानि बोलाविले । दादा चलावे आत वहिले । त्याचा प्राण व्याकुळ होईल । शब्द येईल तुम्हावरी ॥९८॥ सेटि लवलाही निघाला । अंतर मंदिरात गेला । मैत्राचे समीप बैसला । पुसु लागला उठा वेगी ।।९९।। तव ते उठोनि सत्वर । जोडोनिया दोन्ही कर । सेटिस केला नमस्कार । कृपा मजवर करावी ॥१०॥ विरहताप जाली घाबरी । सेटिस तिने धरिले करी। तारुण्याचा भर भारी । येति लहरी मदनाच्या ॥१०१॥ सेटि म्हणे काय करावे । आता कैसे शील राखावे । कोन्ह्यापरि समजावावे । पाप टाळावे कैसेही ।।१०२।। तेव्हा सेटि विचारि मनि । कपाळि पाणि ठेवोनि । म्हणे ऐक वो मम भगिनी । जन्मा येवोनि व्यर्थ जीव ।।१०३॥ मी नपुंसक ठाईचा जान । भोगविलास मजला कोठोन । ऐसे मिळाल्या स्त्रीरत्न । कोण्हाच्यान राहावे पै ॥१०४॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org