Book Title: Aradhana Kathakosha
Author(s): Bhattarak Chandrakirti, Shantikumar Jaykumar Killedar
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
View full book text
________________
२५४ : आराधना-कथाकोष पुत्र न बोलल ज्यायमान । कपिल सांगे वर्तमान । ते समजले पित्याकारण । चित्ति चितवन करितसे ॥६९।। तव तो सेटि सागरदत्त । सखीन सांगितला वृत्तान्त । तो म्हणे मम वचनार्थ । जामात सत्य सुदर्शन ॥७०।। तो आला वृषभदासाघरी । विह्वायासी विनती करी । तुमची वागेस्वरी बरी । करावि खरी विव्हाई आज ॥७॥ अवश्य म्हणे वृषभदास । बोलाविले पंडितास । लग्न नेमावे शुद्ध दिवस । वैशाख मास सुध पंचमी ॥७२॥ दोहिकडे आनंद जाला । पंचदिवस वर मिरवला । विधीयुक्त विहाव केला । संतोष जाला सकळासी ॥७३॥ रमण रमणी मनोहर । सुख भोगिती न कळे पार । पूर्वपुण्य झाला सत्पुत्र । सुंदरवक्त्र जै कामदेव ॥७४॥ नाम ठेविले सुकांत बाळ । प्रौढ झाला तो सुकुमाळ । बाळलीळा खेळे खेळ । कुटुंब सकळ हर्ष हृदयी ।।७५।। ऐसे सुखाचे अवसरि । मुनी आगमन वनांतरि । समाधिगुप्त आचार्य । संघाष्ट सुपरिवण शोभा ॥७६।। वनमाळि सांगे रायासी । राव निघाला परिवारेसी । नगरलोक श्रावकासी । तुर्यवहनासी चालले ॥७७॥ वृषभसेठिचा रथ । सुंदर परिवारसहित । कपिला ब्राह्मणी पाहे त्यात । विरह विषयासक्त जालि |७८॥ म्हणे ऐसा सुंदर पुरुष । माता प्रसवली महाहर्ष । त्या नारीचे भाग्य विशेष । ऐसा पुरुष भोगिताती ॥७९॥ पुत्र होति रत्नासमान । ऐसा पुरुष मी पाहीन । तरिच संसारी जीवेन । मनोरथ मनाचा पुरवीन ॥८॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org