Book Title: Aradhana Kathakosha
Author(s): Bhattarak Chandrakirti, Shantikumar Jaykumar Killedar
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
View full book text
________________
२६६ : आराधना - कथाकोष
हे पटराणिची संतत । अनेक स्त्रिया रायात । तयासी उत्पत्ति बहुत । पुत्र पंचशत बलज्ञानी ॥७॥ दीर्घ नामा जो का प्रधान । तो रायाची आज्ञा पाळून । करितसे राज्यकारण । पूर्वपुण्य सर्वही सुखी ॥८॥ एके दिवसी राये नैनी । कन्या देखिली रूपखानि । उपवर झालिसे नंदिनि । वर पाहोनि लग्न करू ||९|| ब्राह्मण बोलावोनि त्वरे । त्यासि पुसे प्रष्टण उत्तर । तो पाहे पंचांगाचे सूत्र । कन्यका वर कैसा होई ॥१०॥ निमित्ती म्हणे रायासी । भर्त्तार होईल कन्येसी । तुम्ही कराल विवाहासी । तो राज्यासि घेइल तुझे ॥११॥ ऐकोनि निमित्याचे वचन । राजा चिंतातुर मने । संकट पडले येवोन । रात्रंदिन चिंता करीत ॥ १२ ॥
श्लोक | चिंतातुराणां न सुखं न निद्रा, क्षुधातुराणां न बलं न तेजः अर्थातुराणां न पिता न बंधु, कामातुराणां न भयं न लज्जा ॥१३॥ कामातुर जे प्राणी असे । माता भगिनी न मानि चित्तास । शीलही न व्यसनी त्यास । लज्जा तयास असेचि ना ॥ १४ ॥ अर्थातुर जो नरप्राणी । द्रव्य मागे पित्यालागुनि । बंधूस मागे अर्धी वाटणी । झोट धरणी करोनिया ॥ १४ ॥ जो नर असे क्षुधातुर । अन्न बहुत भरी उदर । अजीर्ण होता रोग फार । त्या मुखावर तेज कैचे ।।१५।। चिंता पडली राजियासी । निद्रा न लागे त्या सेजेशी । विसरला सुखभोगासी । रमणी रायासी पुसत ।। १६ ।। अहो हो स्वामी देहधनी । चिंता काय तुमचे मनी । ते सांगावी कृपा करोनी | उपाय करणी करीन ॥ १७॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org