Book Title: Aradhana Kathakosha
Author(s): Bhattarak Chandrakirti, Shantikumar Jaykumar Killedar
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
View full book text
________________
२७० ! आराधना-कथाकोष
राम कृष्ण म्हणता देव । त्याचे तुम्ही घेता नाव । त्याचे चरित्र तुम्हा ठाव । काशा म्हणावे निंदाशब्दे ॥५४॥ ऐसे नीतीस कोटयवरि । देव खरे परि संसारी । ते हिंडति गति चारी । दश अवतारी जन्ममृत्यु ॥५५॥ राया देव म्हणावे कवनासी । हा भेद न कळे तुजसी । जो वेगळा अठरादोषाशी । देव तयासी म्हणावे वो ॥५६॥ कुदेव कुगुरू कुशास्त्र । कुधर्म कुकुळी कुमंत्र । कुमनुष्य कुबुद्धि अपवित्र । न जाने सूत्र आत्मप्रचीति ॥५७॥ देव अनंतज्ञानी विख्यात । गुरूप्रपंचविरहित । निहिंसक सार्थ अर्थ । आत्मप्रचीति ज्यामध्ये ॥५८॥ गुरू असावा सन्याशी । सुज्ञानासी तो प्रकाशी । षड्रिपुसी जो नाशी । गुरू तयासी म्हणावे वो ॥५९|| वेदान्ती सन्याशी समस्त । आटयौसी सहस्र प्रमित । तपस्वी म्हणे आपणात । स्त्रीपुत्रसहित वनवासि ॥६०॥ काम-क्रोध-दंभ-अहंकार । मद सहावा मत्सर । म्हणावे कैसे ऋषीश्वर । तप करिती वनांतरि ॥६१॥ न जानति पापपुण्य । कंदमूळाचे भक्षण । निशि माध्याह्नि भोजन । द्रौपदीन वनांतरि ।।६२|| पुराण सांगति अयथार्थ । पाप पुण्य न कळे अर्थ । शास्त्रकथा अपहितार्थ । आत्मप्रचीति नाही तया ॥६३॥ अंजनीसी पुत्र जाहाला । कुपिनसहित जन्मला । हनुमंत नाम तयाला । वानर झाला पुच्छसहित ॥६४॥ राया ऐक ऋषीम तंत्र । कोन्ही म्हणती वायुपुत्र । कोन्ही म्हणति ऋषिमंत्र । विपरीत तंत्र कलयुगी ॥६५।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org