Book Title: Aradhana Kathakosha
Author(s): Bhattarak Chandrakirti, Shantikumar Jaykumar Killedar
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
View full book text
________________
२१२ : आराधना - कथा कोष
सोमयासि म्हणति बाळा । समुद्रदत्त दावि आम्हाला । तव त्याचा बाप बाहिर गेला । ठाव दाखविला सोमान || ६८॥ त्यावरिल ऐचन काढिले । त्या तळि बाळक देखिले । प्रेत उचलुनि घेतले । उरस्फोटले सर्वाचेहि ||६९ || माता पिता मूच्छित जाली । नारी नर गहिवरली । तव ते माता सावध जाली । पाहु लागली पुत्रमुख ॥७०॥ दीर्घ स्वर करी रुदन | माझे हारपले गे रत्न ।
I
देवा व्यर्थची माझे जीन । काय मी नयन आता पाहु ॥ ७१ ॥ समुद्रदत्त करी खंती । बाळाचि कैसी जाली गती । कोन्ह्या चांडाळ दु:खावति । पाडोनि गति वैरि गेला ॥७२॥ काय आम्ही पाप केले । किंवा दान नाहि दिधले । धर्मगुरुसी काय छळिले । व्रत नाहि केले शक्तिसार ॥७३॥ तत् ऐकोनिया कोल्हाळ | रस्त्यात होता कोटचपाळ । त्यान ऐकोमिया सकळ । रायासी समूळ सांगतसे ॥७४॥ ऐकोनि राजापासि आला । क्रोधे करोन म्हणे दूताला । कोन्या चांडाळे घात केला । पुत्र वधला निर्दयाने ॥७५॥ आनावे तयासि त्वरेन । करावे त्याचे सीरछेदन | अथबा घ्यावे नाक कान । हिंसाकारन करू नये हो ||७६ ॥ गर्धवा करोनिया स्वार । मागे लावावि मातंगपोर | त्यास करावा शेनमार | देशाबाहेर दवडून द्यावा ||७७ || श्लोक | पापी पापं करोतेऽत्र, प्रच्छनमपि पापतः । तत्प्रसिद्धं भवत्यैव कष्टकोटिप्रदायकं ॥७८॥ उक्तंच । माया करोति यो मूढो इंद्रियादिकसेवने । गुप्तं पापं स्वयं तस्य व्यक्तं भवति कुष्टवत् ॥७९॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org