Book Title: Aradhana Kathakosha
Author(s): Bhattarak Chandrakirti, Shantikumar Jaykumar Killedar
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
View full book text
________________
प्रसंग पंधरावा । २०७
विडे घेतले यथास्थित । तेथे होता रायाचा भृत्य । त्याने विचारले मनात । सांगावे राया तजावोया ॥१०॥ तो जावोनि राजसभेत । धनपाळ राया सांगत । शीवभूति जावोनि वनात । कलालहस्ते जेवीला ॥११॥ मद्याचेही केले प्राशन । क्षीर शर्करा उदकपान । विजा तांबोल्य घेवोन । मंडपी जाओन बैसले ॥१२॥ ते ऐकोनिया महिनाथ । बोलविले त्या प्रधानात । पुसता जाला वृत्तान्त । कोणाच्या येथे आहार त्वा ।।१३।। नृप बोले क्रोधे करून । काय तुला होते रे नून । कलाला घरी केले भोजन । लाविले दूषण सत्कुळा ॥१४॥ ब्राम्हण म्हणे वो नपवर । सत्य ऐकावे राजेन्द्र । प्राशन केले दुग्धशर्करा । ब्राम्हण सग्रामि मिळोनि ॥१५॥ त्याच्या गृही कन्येचे लग्न । सर्व ब्राम्हण दिधले अन्न । ते ऐकोनी राजियात । ठेविले दूषण सर्वासी ॥१६॥ तेव्हा जो ब्राम्हण चतुर । वेदवेदांग विद्यापार । म्हणे म्या प्राशन केले क्षीर । परीक्षात्वर दाखवितो ॥१७॥ शीवभूती करी वमन । दुर्गंध सुटला नेत्रहीन । ते पाहताचि रायान । दिला काढून तत् समई ॥१८॥ सांगति दोष भष्ट झाला । कसंग मैत्रीने बुडाला। पश्चात्ताप करू लागला । बटू लागला समस्ताशी ॥१९॥ मग ते सर्व मिळोनीया । रायासन्निध जावोनिया। शास्त्र निर्णय पाहोनिया । प्रायश्चित्त राया घेतो आम्ही ।।२०। मग ते सर्व मिळोनी । देव, गुरु साक्ष करोनी । पूजा अष्टविधा आणोणी । पंडित जनी अभिषेक ॥२१॥
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org