________________
दान
दादाश्री : लक्ष्मी तर टिकेल अशी नाहीच, पण त्याचा मार्ग बदलून टाकला पाहिजे. ती ज्या मार्गाने जात असेल त्याचा प्रवाह बदलून टाकावा आणि धर्माच्या मार्गावर वळवावी. ती जेवढी सुमार्गावर जाईल तेवढी खरी. भगवंत येतील तेव्हा लक्ष्मी टिकेल, त्याशिवाय लक्ष्मी टिकणारच कशी? भगवंत असतील तेथे क्लेश होत नाही आणि फक्त लक्ष्मीजी असेल तर क्लेश आणि भांडणे होतात. लोक लक्ष्मी भरपूर कमवतात, पण ती वाया जाते. एखाद्या पुण्यशाली माणसाच्या हातून लक्ष्मी चांगल्या मार्गाने वापरली जाते. लक्ष्मी चांगल्या मार्गाने वापरली जाते, हे एक मोठे पुण्य म्हटले जाते.
सन १९४२ नंतर लक्ष्मीमध्ये काही सारच नाही. हल्ली लक्ष्मी योग्य ठिकाणी वापरली जात नाही. योग्य जागी खर्च झाली, तर फारच चांगले म्हटले जाईल.
सात पिढ्यांपर्यंत टिकते लक्ष्मी प्रश्नकर्ता : जसे की भारतात कस्तूरभाई लालभाई ची पिढी आहे, तर दोन-तीन-चार पिढ्यांपर्यंत पैसे चालत राहतात, त्यांच्या मुलांच्या मुलांपर्यंत. पण इथे अमेरिकेत कसे आहे की पिढी असते, पण फार तर सहा आठ वर्षात सर्वकाही संपून जाते. एक तर पैसे असले तर जातात आणि नसले तर पैसे येतात सुद्धा. तर त्याचे कारण काय असेल?
दादाश्री : असे आहे ना, तेथील जे पुण्य आहे ना, इंडियाचे पुण्य, ते इतके चिकट असते की सारखे धुतच राहिलो, तरीही जात नाही आणि पाप सुद्धा इतके चिकट असते की धुवतच राहिलो, तरी जात नाही. म्हणजे तो वैष्णव असो की जैन असो, पण त्याने पुण्य इतके मजबूत बांधलेले असते की धुवतच राहिले तरी संपत नाही. जसे की पेटलाद चे दातार सेठ, रमणलाल शेठच्या सात-सात पिढ्यांपर्यंत संपन्नता टिकून राहिली. खोऱ्याने उपसून उपसून धन देत असत लोकांना, तरीही कधी कमी पडले नाही. त्यांनी पुण्य जबरदस्त बांधले होते, एकदम सचोटीने. आणि पापही