________________
दान
जातो की हा भाऊ जरा असाच आहे. म्हणून तो म्हणेल की भाऊ, मुलीच्या लग्नासाठी नगद पैसे मिळणार नाही, तुला जे कपडेलत्ते हवे असेल, आणखी जे काही हवे असेल ते सर्व घेऊन जा. आणि म्हणेल की मुलीला येथे घेऊन ये. मग मुलीला कपडे-दागिने सगळे देणार. नातेवाईकांना मिठाई आपल्या घरुन पाठवून सगळा व्यवहार सांभाळून घेणार. पण समजून जातात की हा बेशर्म आहे. रोख पैसे हातात देण्या लायक नाही. म्हणजे दान देणारेही फार एक्स्पर्ट असतात.
दान कोणाला द्यावे? तुम्ही गरिबाला पैसे दिले आणि नंतर तपास केला तर कळेल की त्यांच्याजवळ तर पाऊण लाख रुपये असतील. कारण ते लोक गरिबीच्या नावाखाली पैसे गोळा करतात. सगळा व्यापारच चालतो. दान तर कुठे द्यावे? तर जे लोक मागत नाही आणि आतल्या आत दु:खी होत राहतात; आणि दबून दबून चालतात, जे सामान्य लोक आहेत, तेथे द्यायचे आहे. त्या मध्ममवर्गीय लोकांना फार समस्या आहेत.
दान, समजदारीपूर्वक एका माणसाच्या मनात ज्ञान झाले. काय ज्ञान झाले? हे लोक थंडीने मरत असतील. इथे घरातही थंडीत राहवले जात नाही. अरे हिमवर्षा होणार आहे आणि या फुटपाथ वर राहणाऱ्यांचे काय होईल? असे त्याला ज्ञान झाले, हे एका प्रकारचे ज्ञानच म्हणावे ना! ज्ञान झाले आणि त्याचा योग चांगला होता. बँकेत पैसा होता, म्हणून शंभर सव्वाशे कांबळ्या घेऊन आला, हलक्या क्वॉलिटीचे. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता जाऊन सगळ्यांना पांघरुण घातले, ते लोक जेथे झोपले होते तेथे जाऊन पांघरुण घातले. पाच-सात दिवसानंतर तो तेथे परत गेला तर कांबळ्याबिम्बळ्या काही दिसत नव्हत्या, कारण सगळ्या नवीन कांबळ्या. विकून पैसे मिळवले त्या लोकांनी!
म्हणून मी म्हणतो की असे देऊच नये. असे दिले जाते का कधी?