________________
दान
31
( तस्कराने ) चोरी केली आणि सुईचे दान दिले. त्या ऐवजी दान नाही दिले पण सरळ राहिला तरी बरे. असे आहे ना, की सहा महिन्याची जेलची शिक्षा बरी, मध्ये दोन दिवस बागेत घेऊन जातील, त्याचा काय अर्थ ?
हे तर काय सांगू इच्छिता की हा सगळा काळा बाजार, तस्करी वगैरे केली आणि नंतर पन्नास हजार दान दिले, जेणे करुन स्वतःचे नाव खराब दिसू नये, स्वतः चे काम बिघडू नये, म्हणून दान देतात, यालाच सुईचे दान म्हणतात.
प्रश्नकर्ता : म्हणजे असे सात्विक तर आता नाहीत ना ?
दादाश्री : असे संपूर्ण सात्विकतेची आशा तर ठेवूच शकत नाही ना! पण हे तर कोणासाठी आहे, की जे मोठे लोक करोडो कमवतात आणि एकीकडे लाख रुपयांचे दान देतात. ते कशासाठी ? तर स्वत:चे नाव खराब होऊ नये. या काळातच असे सुईचे दान चालते. हे खूप समजण्यासारखे आहे. दुसरे लोक दान देतात, त्यातील काही सदगृहस्थही असतात. साधारण परिस्थितीचे असतात. ते लोक दान देतात त्यात हरकत नाही. हे तर सुईचे दान देऊन स्वतःचे नाव बिघडू देत नाही. आपले नाव झाकण्यासाठी कपडे बदलून टाकतात! फक्त दिखाव्यासाठी असे दान देतात !
आता तर धनदान देतात की घेतात? आणि दान जे देतात ते तर 'मिसा'चे (तस्करीचे).
ते धन पुण्य बांधते
प्रश्नकर्ता: दोन नंबरच्या पैशांचे दान दिले, तर ते नाही चालणार?
दादाश्री : दोन नंबरचे दान चालणार नाही. पण तरीही कोणी मनुष्य उपाशी मरत असेल आणि त्याला दोन नंबरचे दान दिले तर त्याला खाण्यासाठी तर चालेल ना ? दोन नंबरच्या पैशात थोड्याश्या कायदेशीर