Book Title: Noble Use Of Money Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 39
________________ 30 दान ऐरणची चोरी, सुई चे दान प्रश्नकर्ता : बरेच जण असे म्हणतात की दान केले तर देवता बनतो, ते खरे आहे काय ? दादाश्री : दान केले, तरी नरकात जातील, असे पण लोक आहे. कारण ते दान कोणाच्या तरी दबावात येऊन करतात. असे आहे की आता या दुषमकाळात लोकांजवळ दान देऊ शकू अशी लक्ष्मीच नसते. दुषम काळातील जी लक्ष्मी आहे ती तर अघोर कर्तव्याची लक्ष्मी आहे. म्हणून जर त्याचे दान दिले तर उलट नुकसान होते. तरीपण जर आपण कोणी दु:खी मनुष्याला दिले, दान देण्याऐवजी त्याची समस्या दूर करण्यासाठी काही केले तर चांगले आहे. दान तर नाव कमवण्यासाठी करतात, त्याला काय अर्थ ? उपाशी असेल तर खायला द्या, कपडे नसतील तर कपडे द्या. बाकी या काळात दान देण्यासाठी रुपये कुठून आणावे ? तिथे सगळ्यात चांगले तर दान-बीन देण्याची गरज नाही. स्वत:चे विचार चांगले करा. दान देण्यासाठी धन कुठून आणावे ? खरे धन आलेच नाही ना! आणि खरे धन सरप्लस राहतच (उरतच) नाही. हे जे मोठे मोठे दान देतात ना, ते सर्व खात्या बाहेरचे, वरचे धन आले आहे, ते आहे. तरीपण जे दान देतात त्यांच्यासाठी चुकीचे नाही. कारण वाईट मर्गाने मिळवले व चांगल्या मार्गाने दिले, तरी पण मधेच पापापासून मुक्त तर झाले ! शेतात बी पेरले गेले, म्हणून उगवले आणि तेवढे तरी फळ मिळाले. प्रश्नकर्ता : भक्तिपदांमध्ये एक ओळ आहे ना, की दाणचोरी करणारे सुईदानाने सुटू इच्छितात. तर तेथे एके ठिकाणी दाणचोरी (चुकीच्या मार्गाने खूप सारे धन कमावणे, तस्करी) केली आणि दुसऱ्या ठिकाणी दान केले, तर त्याने तेवढे तरी प्राप्त केले ना ? असे म्हणू शकतो ? दादाश्री : नाही, प्राप्त झाले असे नाही म्हणवत. ती तर नरकात जाण्याची निशाणी म्हटली जाईल. तो तर नियत चोर आहे. दाणचोराने

Loading...

Page Navigation
1 ... 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70