________________
36
दान
जग काय म्हणेल की हा धर्मिष्ठ आहे. आता त्या माणसाच्या मनात काय असते की पैसे कसे गोळा करु? आणि कसे ते उपभोगू ? मनातुन तर त्याला बिनहक्काची लक्ष्मी हडप करण्याची फार इच्छा होत असते. बिनहक्काचे विषय भोगण्यासही तो तयार असतो. म्हणून भगवंत त्याचा एक पैसाही जमा करत नाहीत. त्याचे काय कारण? कारण हेच की ते सगळे स्थूळ कर्म आहे. आणि त्या स्थूळ कर्माचे फळ इथल्या इथेच मिळते. लोक या स्थूळ कर्मालाच पुढच्या जन्माचे कर्म मानतात. पण त्याचे फळ तर इथल्या इथेच मिळून जाते. आणि सूक्ष्म कर्म जे आतल्या आत बांधले जात आहे, ज्याची लोकांना जाणीवच नाही. त्याचे फळ पुढच्या जन्मी मिळते.
आज एखाद्या माणसाने चोरी केली, ती चोरी स्थूळ कर्म आहे. त्याचे फळ या जन्मातच मिळते. पुलिसवाला मारतो. हे सगळे फळ त्याला इथल्या इथे मिळणारच आहेत.
लक्ष्मीसाठी चार्जिंग
प्रश्नकर्ता : सगळेच लक्ष्मीच्या मागे खूप घावतात. म्हणून त्याचा 'चार्ज' (कर्म बंध) जास्त प्रमाणात होत असेल ना ? त्यामुळे पुढच्या जन्मी त्याला जास्त लक्ष्मी मिळाली पाहिजे ना ?
दादाश्री : आम्हाला लक्ष्मी धर्माच्या मार्गावर खर्च करायची आहे, असे जर चार्ज केलेले असेल तर जास्त लक्ष्मी मिळेल.
प्रश्नकर्ता : पण मनात असे भाव करत राहिले की मला लक्ष्मी मिळो, असे भाव केले, असे 'चार्ज' केले त्यामुळे त्याला निसर्ग लक्ष्मी नाही का देणार ?
दादाश्री : नाही, नाही, त्यामुळे लक्ष्मी मिळत नाही. लक्ष्मी मिळण्याचे जो भाव करतो ना, त्याला तर लक्ष्मी मिळायची असेल तरी मिळणार नाही, उलट त्यात अंतराय पडतील. लक्ष्मी आठवत राहिल्याने मिळत नाही. ती तर पुण्य केल्यानेच मिळते.