________________
दान
41
प्रश्नकर्ता : सोबत काय येते, म्हणालात?
दादाश्री : सोबत तर आपण जे आत्म्यासाठी देतो, त्याने आत्म्याची शक्ति खूप उमलते. ते आमच्या सोबत येते.
प्रश्नकर्ता : आणि इथे जो खर्च केला, ते तर वाह-वाह करतात तेच मिळते ना?
दादाश्री : मिळाले, वाह-वाह मिळाली.
वाह-वाह चे भोजन
प्रश्नकर्ता : मी जे दान करतो त्यात माझा भाव धर्मासाठी, चांगल्या कामासाठी असतो. त्यात लोकांनी वाह-वाह केली तर ते सारे उडून नाही का जाणार!
दादाश्री : यात मोठी रक्कम खर्च झाली, ती जाहिर होते आणि त्याची वाह-वाह केली जाते. आणि अशी रक्कमही दान दिली जाते जी कोणाला कळतही नाही आणि त्याची कोणी वाह-वाह करत नाही. म्हणून त्याचा लाभ होतो. आपल्याला त्या भानगडीत पडण्यासारखे नाही. आपल्या मनात असा भाव नाही की लोकांनी आम्हाला 'वाढावे!' हा इतकाच भाव असला पाहिजे. जग तर महावीरची पण वाह-वाह करत होते. पण ती ते स्वतः स्वीकारत नव्हते ना! या दादांची पण लोक वाह-वाह करत होते! पण ती ते स्वतः स्वीकार करत नाही ना! आणि हे उपाशी लोक तर लगेच स्वीकारतात. दानाचा पत्ता लागल्याशिवाय रहातच नाही ना! लोक तर वाह-वाह केल्याशिवाय राहणारच नाही, पण स्वतः जर त्याचा स्वीकार केला नाही, तर मग काय हरकत? स्वीकार केला तर रोग प्रवेशेल ना? जो वाह-वाह स्वीकारत नाही त्याला काहीही होत नाही. स्वतः वाह-वाह स्वीकारत नाही. म्हणून त्याला काही नुकसान होत नाही, आणि प्रशंसा करणाऱ्याला पुण्य मिळते. सत्कार्याच्या अनुमोदनेचे पुण्य बांधले जाते. अर्थात हे तर सगळे निसर्गाचे नियम आहेत.