________________
दान
आपपल्या इच्छेनुसार दान द्यायचे असते. हे तर सगळे ठीक आहे, व्यवहार आहे. कोणी आग्रह करेल की आपल्याला द्यावेच लागतील. मग फुलहार घालतात म्हणून देतात ते.
दान गुप्त असावे. जसे हे मारवाडी लोक देवाजवळ चुपचाप पेटीत टाकतात ना! कोणालाही कळले नाही, तर ते उगवते.
तो व्यवहार चांगला म्हणवतो प्रश्नकर्ता : हिराबाच्या बाबतीत आपण त्यांच्या मागे (त्यांच्या मृत्युनंतर) जो खर्च तेला, तो व्यवहारात कसा समजला जातो?
दादाश्री : या संसार व्यवहारात तो चांगला मानला जातो. प्रश्नकर्ता : आम्हाला संसार व्यवहारातच राहायचे.
दादाश्री : या संसार व्यवहारात हे बरोबर पण त्यात हे चांगले दिसते. आणि ते चांगले दिसावे म्हणून मी केले नाही. ही तर हिराबाची इच्छा होती म्हणून मी केले, मला बरे-वाईटाची काही पर्वा नसते, पण तरीही वाईट दिसू नये असे मी वागतो.
प्रश्नकर्ता : ही तर तुमची गोष्ट झाली पण आमच्यासाठी काय?
दादाश्री : तुम्हाला थोडे फार करावे लागते, फार खेचण्याची गरज नाही, साधारण व्यवहार करावा लागेल.
वाह-वाहमध्ये पुण्य खर्च होते प्रश्नकर्ता : हे तुम्ही म्हणता तसे नियम असेल, तर तुम्ही जे हिराबांमागे (दादाश्रींच्या पत्नी) जे खर्च केले त्याचे तुम्हाला पुण्य मिळेल?
दादाश्री : मला काय मिळेल? मला काही घेणे-देणेच नाही ना! यात पुण्य बांधले जात नाही, यात तर पुण्य खर्च होते. वाह-वाह केली जाते.