________________
40
दान
किंवा जर कोणी खराब केले तर 'बघाना, मेल्याने सारे काम बिघडवले' असे म्हणतील. अर्थात् इथल्या इथेच हिशोब होऊन जातो. हाईस्कूल बनवले, तेव्हा इथल्या इथेच वाह-वाह झाली. तेथे मिळत नाही. प्रश्नकर्ता : शाळा तर मुलांसाठी बनवली. ती मुले शिकली सवरली. सद्विचार उत्पन्न झाले.
दादाश्री : ती गोष्ट वेगळी आहे. पण तुमची वाह-वाह झाली तर संपले, पुण्य खर्च झाले.
कोणाच्या निमित्ताने कोणाला मिळते ?
प्रश्नकर्ता : वाह-वाह तर ज्याच्यासाठी खर्च केले, त्यालाच जाईल ना, तुम्हाला नाही. तुम्ही ज्याच्यासाठी जे कार्य करता, त्याचे फळ त्याला मिळते. ज्याच्यासाठी आपण जे पुण्य करतो ते त्याला मिळते. आपल्याला मिळत नाही.
दादाश्री : आम्ही करायचे आणि त्याला मिळणार ? असे कधी ऐकले आहे का ?
प्रश्नकर्ता : त्याच्या निमित्ताने आपण करतो ना ?
दादाश्री : त्याच्या निमित्ताने करा ना ? ! मग तर त्याच्या निमित्ताने आपण खाल्ले तर काय हरकत ? नाही, नाही, तसे काही त्यात फरक नाही. ते तर सगळे बनावटीने लोकांना उलट रस्त्यावर चढवतात, म्हणे त्याच्या निमित्ताने ! त्याला खायाचे नसेल आणि आम्ही खाल्ले तर काय वाईट आहे ? सगळे नियमबद्ध आहे हे संपूर्ण जग.
तेथे उमलते आत्मशक्ति
बाकी, सोबत ते येणार आहे ? हे काही सोबत येत नाही. येथे लगेच त्याची किंमत मिळते, वाह-वाह लगेचच मिळते. आणि आत्म्याकरिता जे ठेवले, ते सोबत येते.