________________
दान
49
प्रमाणे ? लग्नात खर्च होतो ना ? नंतर वरुन थोडे - फार द्या. तिला दागिने वगैरे दिले, ते देतातच ना! पण स्वतःचा पैसा तर स्वतःच खर्च केला पाहिजे.
प्रश्नकर्ता : मुलांना पारिवारिक व्यवसाय सोपावा आणि कर्ज दिले पाहिजे ना?
दादाश्री : आपल्याकडे मिलियन डॉलर असो किंवा अर्धा मिलयन डॉलर असो, तरीही मुलगा ज्या घरात राहतो, ते घर मुलाला द्यावे. नंतर त्याला एक काम- - धंदा सुरु करुन द्यावा, त्याला आवडत असेल ते. कोणते काम त्याला आवडते, ते विचारुन मग जे काम त्याला ठीक वाटेल, ते चालू करवून द्यायचे. आणि पंचवीस - तिस हजार बँकेतून मिळवून द्यावे, लोन वर. मग तो स्वतःच लोन भरत राहील. आणि थोडे-फार आपण द्यायचे. त्याला हवी असेल त्यातली अर्धी रक्कम आपण द्यावी आणि अर्धी बँकेतून, म्हणून मग तो लोन भरत राहील. म्हणजे कोणी धक्का मारणारा हवा त्याला. ज्यामुळे तो दारु पिणार नाही. मग मुलगा म्हणेल की, ‘या वर्षी माझ्याकडून लोन भरली जाणार नाही.' तेव्हा म्हणावे की, मी आणून देतो तुला पाच हजार कोणाकडून, पण लवकरच परत करायचे आहे. असे सांगून पाच हजार आणून द्यायचे. मग आपण त्या पाच हजाराची आठवण करुन द्यावी, की 'लवकर परत करा, असे ते म्हणाले आहे.' अशी आठवण करुन दिली तर मुलगा म्हणेल, 'तुम्ही कटकट करु नका आता.' तेव्हा आपण समजून जावे. 'खूप चांगले आहे हे.' म्हणून मग तो पुन्हा घ्यायला येणारच नाही ना! 'कटकट करता' असे म्हणाला, त्याची आपल्याला हरकत नाही, पण मग पुन्हा घ्यायला तर येणार नाही ना !
अर्थात् आपली सेफसाइड आपण ठेवावी आणि परत मुला समोर आपले वाईटही दिसत नाही. मुलगा म्हणेल, 'वडील तर चांगले आहेत ! ' पण माझा स्वभाव वाकडा आहे. मी उलट बोललो म्हणून. बाकी वडील तर फार चांगले आहेत. तात्पर्य पळ काढावी या जगातून.