________________
दान
57
म्हणजे अशी भली माणसे असतात ज्यांना दान कसे देणे हे समजत नसते, आणि ते सुद्धा त्याने विचारले तर आम्ही सांगतो. आम्हाला माहित आहे की तो साधा-भोळा आहे. त्याला समजत नाही म्हणून मग त्याला सांगतो. बाकी, समजदारांना तर काही सांगण्याची आम्हाला गरज नाही ना! नाहीतर त्याला दुःख होईल. आणि दुःख होईल असे आम्हाला नकोच. इथे पैशांची गरजच नाही. सरप्लस असेल तरच द्या. कारण ज्ञानदानासारखे दुसरे कोणतेही दान नाही या जगात !
कारण या ज्ञानाची पुस्तके कोणी वाचेल, तर त्याच्यात कितीतरी परिवर्तन होईल. म्हणून असेल तर द्यावे, नसेल तर आपल्याकडे तशी काही गरजही नाही.
सरप्लसचे दान प्रश्नकर्ता : सरप्लस कशाला म्हणतात?
दादाश्री : सरप्लस तर आज तुम्ही द्याल आणि उद्या तुम्हाला चिंता होईल अशी परिस्थिती असेल त्यास सरप्लस म्हणत नाही. आता पुढच्या सहा महिन्यापर्यंत मला काही अडचण होणार नाही, असे स्वत:ला वाटले तरच काम करावे, अन्यथा करु नये.
तसे तर हे काम जर तुम्ही कराल तर तुम्हाला अडचण येणारच नाही. हे काम तर आपल्या आपणच पूर्ण होते. हे तर देवाचे काम आहे. हे काम जो कोणी करतो त्याचे तशेच्या तशे बरोबर होऊन जाते. पण तरीही मी तुम्हाला चेतावणी दिली पाहिजे. समजल्याशिवाय, विचारकेल्याशिवाय करा असे मी कशाला सांगू? डोळे मिटून यात उडी मारा, असे करायला मी का म्हणून सांगू? मी तर तुमच्या हितासाठी चेतावणी देतो की, 'मागच्या जन्मी तुम्ही दिले होते म्हणून आज तुम्हाला मिळत आहे, आणि आज द्याल तर ते परत मिळेल. हे तर तुमचेच ओवरड्राफ्ट आहे. यात मला काही घेणे-देणे नाही. मी तर तुम्हाला चांगल्या जागी देण्यास लावतो, एवढेच.' मागच्या जन्मी जे दिले होते ते ह्या जन्मात