________________
दादाश्री : तेवढे चांगले, मग तर समंजस आहात. हिसाकावण्यासाठीच तर येतात. इथे नाही गेले तर तिथे जातील. म्हणून चांगल्या जागी देऊन टाकावे. नाहीतर इतरत्र तर जाणारच आहे. धनाचा स्वभावच तसा आहे, चांगल्या मार्गाने नाही गेले तर वाईट मार्गाने जाईल. चांगल्या मार्गाने कमी गेले व वाईट मार्गाने जास्त गेले.
प्रश्नकर्ता : चांगला मार्ग दाखवा. कसे कळावे की मार्ग चांगला आहे की वाईट?
दादाश्री : चांगला मार्ग तर तसा.... आम्ही एक सुद्धा पैसा घेत नाही. मी स्वतःच्या घरचे कपडे घालतो. या देहाचा मी मालक नाही! सव्वीस वर्षापासून मी या देहाचा मालक नाही. या वाणीचा मी मालक नाही. तर आता आपल्याला काही खात्री पटली, माझ्यावर थोडा विश्वास बसला, म्हणून मी तुम्हाला सांगतो की भाऊ, अमक्या ठिकाणी तुम्ही पैसे दिले तर चांगल्या मार्गाने खर्च होतील. तुम्हाला माझ्यावर विश्वास बसला म्हणून मी तुम्हाला सांगितले तर त्यात काही हरकत आहे?
प्रश्नकर्ता : नाही.
दादाश्री : तोच चांगला मार्ग आहे. आणखी कुठला? सांगणारा विश्वसनीय असावा! त्याचे त्यात अजिबात कमिशन नसावे. एक पैसा पण त्यात कमिशन नसावे, तेव्हा तर ते विश्वसनीय म्हणवेल! आम्हाला असे दाखवणारे भेटले नाही. आम्हाला तर ज्यात त्यात कमिशन... (जाईल असे दाखवणारे भटलेत)
प्रश्नकर्ता : दादाजी आम्हाला मार्ग दाखवत राहा.
दादाश्री : जिथे थोडे-फार पण कमिशन आहे, तिथे चुकीच्या मार्गावर पैसा जातो,. आतापर्यंत तर या संघाचे चार आणे देखील खर्च झाले नाही, कोणी कारकून किंवा त्याच्या नावावर. सगळेच स्वतःचा पैशाने काम करुन घेतात, असा हा संघ, पवित्र संघ! म्हणजे खरा मार्ग हा आहे. जेव्हा द्यायचे असेल तेव्हा द्या आणि ते सुद्धा तुमच्या जवळ असतील