Book Title: Noble Use Of Money Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 62
________________ दान तरच, नसतील तर नका देऊ. आता हा भाऊ म्हणेल, 'मी पुन्हा देऊ दादाजी?' तर मी म्हणेल, नाही भाऊ, तू तूझा धंदा करत जा. आता एकदा दिले त्याने! मग पुन्हा देण्याची इथे गरज नाही. असेल तर शक्तिनुसार द्यावे. जेव्हा दहा रतल वजन उचलू शकत असाल तर आठ रतल उचला, अठरा रतल इचलू नका. दु:खी होण्यासाठी करायचे नाही. पण सरप्लस (जास्तीचे) धन उलट मार्गाने जाऊ नये, त्याकरिता हा मार्ग दाखवत आहोत. हो, नाहीतर लोभ आणि लोभातच चित्त भटकत राहील! म्हणून ज्ञानी पुरुष दाखवतात की अमक्या ठिकाणी वापरा. धन द्या सीमंधर स्वामींच्या मंदिरात अधिक धन असेल तर ते सीमंधर स्वामींच्या मंदिरात देण्यासारखे आहे, दूसरे एकही स्थान नाही. आणि कमी धन असेल तर महात्म्यांना भोजन करवावे, त्यासारखे दूसरे काहीच नाही! आणि त्यापेक्षाही कमी असेल तर एखाद्या दु:खी माणसाला द्यावे. आणि ते सुद्धा नगदी नव्हे, तर त्याला खाणे-पिणे इत्यादी देऊन. कमी पैश्यातून सुद्धा दान करायचे असेल तर परवडेल की नाही परवडणार! ओळखा सीमंधर स्वामींना आपल्या इथे आपण सीमंधर स्वामींचे नाव तर एकले ना? ते वर्तमान तीर्थंकर आहेत, महाविदेह क्षेत्रामध्ये ! त्यांची उपस्थिती आहे आजही. सीमंधर स्वामींचे वय किती? साठ सत्तर वर्षांचे असेल? पावणे दोन लाख वर्षाचे वय आहे ! आणखी सव्वा लाख वर्ष जगणार आहेत. हे त्यांच्यासोबत तार, संबंध जोडून देतो, कारण तेथे जायचे आहे. अजून एक जन्म बाकी राहील. इथून सरळ मोक्ष होणार नाही. आणखी एक जन्म बाकी राहील. त्यांच्या जवळ बसायचे आहे, म्हणून सांधा जुळवून देतो. आणि हे भगवंत संपूर्ण जगाचे कल्याण करतील. साऱ्या जगाचे कल्याण होईल! साऱ्या जगाचे कल्याण होईल त्यांच्या निमित्ताने. कारण ते जिवंत आहेत. जे गेलेत ते काही करु शकत नाही, फक्त पुण्य बांधले जाते.

Loading...

Page Navigation
1 ... 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70