________________
44
दान
प्रश्नकर्ता : त्यांची सुटका लवकर होते?
दादाश्री : हो, ते लोक मोक्षला जातात. केवळज्ञान होते. परंतु तीर्थंकर तर हे क्षित्रयच असतात. हे लोक सगळे कबुल करतात माझ्यासमोर, आम्ही क्षत्रिय म्हणवतो. आम्हाला असे येत नाही. फार गहन आहे ते. आणि ही तर विचारशील प्रजा. सगळेच समजून-उमजून, प्रत्येक गोष्टिचा विचार करुन काम करतात. आणि आम्हाला (क्षत्रियांना) जो पश्चाताप होतो त्याची सीमा नाही. त्यांना पश्चाताप कमी होतो.
...पण पाटीमुळे नष्ट झाले कोणी धर्मासाठी लाख रुपये देतो आणि स्वत:च्या नावाची पाटी लावायला सांगतो आणि कोणी एकच रुपया धर्मासाठी देतो, पण गुप्तपणे देतो, तर हे गुप्तपणे दिलल्याची फार किंमत आहे, मग जरी त्याने एकच रुपया दिला असो. आणि जर पाटी लावून घेतली तर ती 'बेलेन्स शीट'(हिशोब) पूर्ण झाला. तुम्ही मला शंभराची नोट दिली आणि मी तुम्हाला त्याचे सुटे दिले. त्यात मग मला काही घेणे राहिले नाही आणि तुम्हाला काही देणे राहिले नाही! तुम्ही धर्मासाठी दान देऊन स्वतःच्या नावाची पाटी लावून घेतली म्हणून नंतर काही घेणे-देणे राहिले नाही ना! कारण जे धर्मसाठी दान दिले त्याचा मोबदला त्याने पाटी लावून मिळवला. आणि ज्याने एकच रुपया प्राइवेटमध्ये दिला असेल, त्याचे काही घेणे-देणे झाले नाही, म्हणून त्याचे बॅलेन्स बाकी राहिले.
आम्ही मंदिरात वगैरे सगळ्या ठिकाणी फिरलो आहोत. तेथे काही ठिकाणी सगळ्या भिंती पाट्या-पाट्यानीच भरलेल्या होत्या. त्या पाट्यांची वेल्युएशन (किंमत) किती! अर्थात फक्त किर्तीसाठीच! आणि जिथे किर्ती हेतुसाठी ढिगभर असेल, तेथे मनुष्य बघतही नाही, की यात काय वाचायचे? संपूर्ण मंदिरात एकच पाटी असेल तर ती वाचण्यासाठी वेळ काढेल पण इथे तर भरपूर, सगळ्याच्या सगळ्या भिंती पाट्यानीच भरलेल्या असल्या तेव्हा मग काय होईल? तरीपण लोक म्हणतात की माझी पाटी लावा! लोकांना पाट्याच आवडतात ना!