________________
दान
35
दादाश्री : अरे कित्येक तर आपला रुबाब जमवण्यासाठी देतात. नाव, स्वतःची अब्रु वाढविण्यासाठी देतात. मनात तर असे असते, की जाऊ द्या ना! देण्यासारखे तर नाही, पण आमचे वाईट दिसेल, तेव्हा मग तसे फळ मिळते. हे सर्व जसे चित्रित करतात तसे फळ मिळते. आणि एखाद्या मनुष्याजवळ पैसे नसतील पण तरी 'माझ्याजवळ असते तर मी दिले असते.' असे म्हणेल, त्याला कसे फळ मिळते?
स्थूळ कर्म-सूक्ष्म कर्म एका शेठने पन्नास हजार रुपयांचे दान दिले. त्यावर त्याच्या मित्राने त्यांना विचारले, इतके सारे रुपये दिले? तेव्हा शेठ म्हणाले, 'मी तर एक पैसा पण देणाऱ्या पैकी नाही.' हे तर मेयरच्या दबावामुळे मला द्यावे लागले; आता याचे फळ येथे काय मिळेल? पन्नास हजारांचे दान केले ते स्थूळ कर्म, तर त्याचे फळ शेठजीला इथल्या इथेच मिळेल, लोक वाह-वाह करतील, कीर्ति गातील, आणि शेठजीने आत सूक्ष्म कर्ममध्ये काय चार्ज केले? तेव्हा म्हणे एक पैसा पण देणाऱ्या पैकी नाही मी त्याचे फळ पुढच्या जन्मी मिळेल, म्हणून मग पुढच्या जन्मी शेठ एक पैसा सुद्धा दान देऊ शकणार नाही. आता अशी बारीक गोष्ट कोणाच्या लक्षात येईल?
मग तेथेच दुसरा एखादा गरीब राहत असेल, त्याच्याकडे सुद्धा हेच लोक दान घेण्यासाठी गेले. तेव्हा तो गरीब मनुष्य काय सांगतो की, 'माझ्याकडे तर आता पाचच रुपये आहेत. हे सगळेच घ्या. पण माझ्याकडे जर आता पाच लाख असते तर मी ते सगळेच्या सगळे तुम्हाला दिले असते,' असे तो मनापासून म्हणतो. आता त्याने पाचच रुपये दिले, ते डिस्चार्जमध्ये कर्मफळ आले. पण आत सूक्ष्ममध्ये काय चार्ज केले? पाच लाख रुपये देण्याचे. म्हणून पुढच्या जन्मी तो पाच लाख देऊ शकेल, डिस्चार्ज होईल तेव्हा.
एक मनुष्य नेहमी दान करत असतो, धर्माची भक्ति करत असतो, मंदिरात पैसे देत असतो, दिवसभर असे सर्व धर्म करत असेल, त्याला