________________
दान
33
ते आहे केमोफ्लेज सारखे प्रश्नकर्ता : दोन नंबरचा जो पैसा आहे, तो जेथे जाईल तेथे गडबड होते की नाही?
दादाश्री : पूर्ण मदत नाही करत, आमच्या येथे पण येतात, पण ते किती असतात? दहा ते पंधरा टक्के, पण जास्त येत नाहीत.
प्रश्नकर्ता : धर्मात मदत करत नाही का? जिथे जाईल तिथे मदत नाही होत तेवढी?
दादाश्री : मदत करत नाही. तसे दिसतांना मदत केलेली दिसते, पण नंतर अस्त व्हायला वेळ लागत नाही. हे सगळे वॉर क्वॉलिटीचे स्ट्रक्चर. वॉर क्वॉलिटीचे स्ट्रक्चर बांधले सगळे! आपण पाहिले ना! हे सर्व केमोफ्लेज (सोंग) आहे. केमोफ्लेज पाहून मनात काय खुश व्हावे?
श्रेष्ठी-शेट्टी-सेठ-शठ पूर्वीच्या काळात, त्यावेळी दानवीर असत. दानवीर तर मन-वचनकायेची एकता असेल तरच जन्माला येतात, आणि त्यांना भगवंतांनी श्रेष्ठी म्हटले होते. त्या श्रेष्ठींना आता मद्रासमध्ये शेट्टी म्हणतात. अपभ्रंश होतहोत श्रेष्ठी चे शेट्टी झाले तेथे. आणि तेच आपल्या येथे अपभ्रंश होत होत 'शेठ' झाले आहे.
एका मिलच्या सेठजीकडे मी त्यांच्या सेक्रेटरीशी बोलत होतो, मी विचारले, शेठ कधी येणार? दुसऱ्या गावी गेले का ते? तो म्हणाला चारपाच दिवस लागतील. नंतर मला म्हणाला, जरा माझी गोष्ट ऐका, मी म्हणालो 'हो भाऊ.' तर तो म्हणाला वरची मात्रा काढून टाकण्यासारखे आहे. मी त्याला समजावले की, 'आता तू पगार खातोस, तोपर्यंत बोलू नकोस.' बाकी मात्रा काढली तर शेष काय उरले?
प्रश्नकर्ता : 'शठ' उरले.