Book Title: Noble Use Of Money Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 38
________________ दान 29 ती पण हिंसाच प्रश्नकर्ता : व्यापारी नफा जास्त करतात, एखादा उद्योगपती किंवा व्यापारी मेहनतीच्या तुलनेने कमी मजुरी देतात किंवा विना मेहनतीची जी काही कमाई होत असेल, तर ती हिंसाखोरी म्हटली जाते का? दादाश्री : ती सर्व हिंसाखोरीच आहे. प्रश्नकर्ता : आता जर का तो फुकटची कमाई करेल आणि धन धर्मासाठी खर्च करेल तर ती कोणत्या प्रकारची हिंसा म्हटली जाते? दादाश्री : जितका पैसा धर्मकार्यासाठी खर्च केला, जितका त्याग केला, तितका कमी दोष लागतो. जितके पैसे तो कमवतो, समजा लाख रुपये कमवले व त्यातील ऐंशी हजाराचा दवाखाना बनवला तर तितक्या रुपयांची जबाबदारी त्याला राहिली नाही. वीस हजाराचीच जबाबदारी राहिली. म्हणजे ते चांगले आहे, चुकीचे नाही. प्रश्नकर्ता : लोक लक्ष्मी जमा करुन ठेवतात, ती हिंसा म्हटली जाईल की नाही? दादाश्री : हिंसाच झाली ती. जमा करुन ठेवणे ती हिंसा आहे. दुसऱ्यांच्या कामी लागत नाही ना! जसे येतात तसे जातात हे तर देवाच्या नावावर, धर्माच्या नावावर सगळे चालत आहे. प्रश्नकर्ता : दान करणारा मनुष्य तर असे मानतो की मी तर श्रद्धेने दिले आहे. पण ज्याला खर्च करायचे आहे तो कसे खर्च करतो, ते आम्हाला कसे कळेल? दादाश्री : पण हे तर आमचे पैसे खोटे असतील तर चुकीच्या मार्गाने जातील. जितके धन खोटे तितके वाईट मार्गाने जाते आणि धन जितके चांगले असेल तितके चांगल्या मार्गाने जाते.

Loading...

Page Navigation
1 ... 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70