________________
दान
असे आहे, हे जे पैसे कमवायला निघतात ना, जरी चांगल्या प्रकारे घर चालत असले तरी पैसे कमवायला निघतात. तेव्हा आपल्याला हे नाही का समजत की हे स्वतःच्या कोटा व्यतिरिक्त जास्त कोटा मिळवण्यासाठी फिरत आहेत. जगात तर सर्वांचा कोटा समान आहे. पण हा लोभी आहे जो जास्तीचा कोटा घेऊन जातो. म्हणूनच त्या काही लोकांच्या वाट्याला येतच नाही. आणि ते सुद्धा असेच थापा मारुन मिळत नाही, तर ते पुण्यानेच मिळते.
तेव्हा पुण्य जास्त केले, म्हणून आता आमच्याकडे धन आले, आणि ते धन परत आपण खर्च करुन टाकतो. आम्हाला वाटते की हे तर जमा होत राहिले आहे. खर्च केले तर डिडक्शन (कमी) होऊ शकेल ना? पुण्य जमा तर होऊनच जाते, पण ते डिडक्शन करण्याची रीत तर जाणून घेतली पाहिजे ना?
अर्थात् लोक मंदिर वगैरे बनवतात, बरोबर करतात. त्यांना चावी हवी. त्यांना दर्शन थोडीच करायचे आहे. ते जेथे दर्शन करायला जातात, तेथे त्यांना लाज वाटू नये असे त्यांना पाहिजे. जिवंत माणसांसमोर त्यांना लाज वाटते पण मूर्तीच्या समोर तर तुम्ही म्हणाल तसे तो नाचेल सुद्धा! नाचत राहतो एकटाच! पण जीवंतांसमोर त्याला लाज वाटते. या मूर्त्या जीवंत नाहीत ना. आणि जीवंतांसमोर काही होऊ शकत नाही. आणि जीवंतांसमोर जर केले तर त्याचे कल्याणच होऊन जाईल, परमकल्याण होईल, आत्यंतिक कल्याण होईल. पण अशी शक्ति नसते ना! असे पुण्यही नसते!
देवाजवळ जे ठेवाल ना, ते सगळे निष्काम नाही, सकाम आहे. हे देवा, मुलाच्या घरी मुलगा व्हावा! माझा मुलगा पास व्हावा. घरी म्हातारा बाप आहे त्याला पक्षाघात झाला आहे, तो बरा व्हावा, त्यासाठी दोनशे एक ठेवतो. पण आता येथे तर कोण ठेवणार? आमचा असा कोणता कारखाना आहे का? आणि इथे घेणारही कोण आहे की तो ठेवेल?