________________
दान
23
त्यांना तर रविवारच्या बाजारात जुने कांबळे मिळतात ना, ते आणून द्या. मग ते तर कोणी बापही त्यांच्याकडून विकत घेऊ शकत नाही. आपण त्यांच्यासाठी सत्तर रुपयांचे बजेट ठेवले असेल तर सत्तर रुपयांचे एक कांबळे आणण्या ऐवजी, सत्तर रुपयांचे जुने तीन मिळत असतील तर तीन द्यावे. तीन पांघरुन झोपून जा, मग कोणी बापही घेणारा मिळणार नाही.
अर्थात् या काळात दान द्यायचे असेल तर फार समजून उमजून द्यावे. पैसा मूळातच स्वभावाने खोटा आहे. दान देण्यासाठीही फार विचार कराल तेव्हा दान देऊ शकाल, नाहीतर दानही देऊ शकणार नाही. पूर्वी खरा रुपया होता ना, तेव्हा जेथे देऊ तेथे खरे दानच होत असे.
आता नगद रुपया देऊ शकत नाही, पण कुठूनही खाण्याची वस्तू विकत घेऊन वाटावी. मिठाई आणली तर मिठाई वाटावी. मिठाईचे पॅकेट दिले तर ते मिठाईवाल्याला म्हणतील ह्याची अर्धी किंमत देऊन टाक. आता या जगाचे काय करावे ? आपण आरामात चिवडा आहे, कुरमुरे आहेत, सफरचंद आहे, असे सर्व, आणि भजी आणून ती त्यांना तोडून वाटावी. घे भाऊ! त्यात काय हरकत आहे ? आणि हे दही घेऊन जा, भजी अशी तोडून का दिली? असे विचारले तर त्याला शंका येऊ नये म्हणून दही पण सोबत घेऊन जा, म्हणजे तुझ्यासाठी दहीवडे बनतील. अरे! पण काय करावे मग ? असे काहीतरी तर असावे ना ?
याचा तर काही पार येईल असे नाही. हो, आणि मागायला येतील तेव्हा पण द्या. पण नगद देऊ नका; नाहीतर दुरुपयोग होत आहे ह्या सगळ्याचा. आपल्या देशातच हे असे आहे. जगात या इंडियन पझलला (भारतीय कोड्याला) कोणी सोडवू शकत नाही.
हे कसे ? हे काय आहे ? हे कोडे सोडवायला पाठवा की भाऊ, हे आमच्याकडे असे काय आहे ? कांबळ्या दानात दिल्या होत्या त्या कुठे गेल्या ? त्या शोधून काढा. तेव्हा ते म्हणतील की सी.आई.डी ला बोलवा. अरे, हे सी. आई.डी. चे काम नाही. आम्ही तर हे सी. आई.डी. शिवायही पकडून टाकू. ही इंडियन पझल आहे. तुमच्याकडून सोल्व होणार नाही.