________________
20
दान
दादाश्री : कितीतरी लोकांना मदत केली असेल तेव्हा लक्ष्मी आमच्याकडे येते, नाहीतर लक्ष्मी येणारच नाही ना ! ज्याला घेण्याचीच इच्छा असेल, त्याच्याकडे लक्ष्मी येत नाही. आली तरी निघून जाते, टिकत नाही. कसेही करुन घेऊच इच्छितो, त्याच्याकडे लक्ष्मी येत नाही. लक्ष्मी तर देण्याची इच्छा असणाऱ्यांकडेच येते. जो इतरांसाठी झीजतो, ठगला जातो, नोबिलीटी राखतो, तेथे येते. तशी लक्ष्मी निघून गेली असे वाटते पण येऊन परत तेथेच उभी राहते.
बघा, दान देण्याचे चुकू नका
ते तर येईल तेव्हाच दिले जाईल ना. आणि जवळ काही नसेल तेव्हा मनात काय विचार करतो माहित आहे ? जेव्हा माझ्याजवळ येतील तेव्हा देऊनच टाकायचे आहे. आणि आले की लगेच थप्पी एकीकडे ठेवून देतो. मनुष्याचा स्वभाव कसा आहे की असे वाटते. देऊया आता, आता माझ्याकडे दीड लाख आहे. दोन लाख पूर्ण होतील तेव्हा देईन. आणि असे करत करत ते राहून जाते. अशा कामात तर डोळे मिटून देऊन टाकले तेच खरे सोने.
प्रश्नकर्ता : दोन लाख जमा होतील तेव्हा खर्च करु, असे म्हणणारा मनुष्य असे म्हणत म्हणतच निघून गेला तर ?
दादाश्री : तो निघूनही जाईल आणि राहूनही जाईल. राहिला तरी काही होऊ शकत नाही. जीवाचा स्वभावच असा आहे. जेव्हा नसतील तेव्हा म्हणेल, ‘माझ्याकडे येतील तर मला लगेचच द्यायचे आहे. ' आले की लगेचच द्यायचे आहे. आणि जेव्हा येतात तेव्हा ही माया त्याला गोंधळून टाकते.
आता समजा एखाद्या माणसाने साठ हजार रुपये परत नाही केले, तेव्हा म्हणेल, चालेल आता. चला जे काही असेल ते पण माझ्या नशीबात नव्हते. तेथे पैसे सुटतात, पण येथे सुटत नाहीत. मनुष्याचा स्वभावच असा आहे. माया त्याला गुरफटून टाकते. त्यात तर हिम्मत केली तरच दिले